Mumbai News: सध्याच्या जंक फूडच्या जमान्यात सकस, पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष होते. अनेक कंदमुळाची माहिती नव्या पिढीला माहीत नाही. वसईतील निर्मळ यात्रेत कोकणातील शेतमाल दाखल झाला असून, शरीरासाठी गुणकारी असलेल्या कंदमुळांना माेठी मागणी आहे. .वसईच्या यात्रेत कोनफळ, कनक, रताळी यासह अन्य कंदमुळे इंदापूर, पेण, पाली, मंडणगाव या भागातून व्यावसायिकांनी टेम्पोने वाहतूक करून आणली आहेत. त्यामुळे वसईसह कोकण आणि अन्य भागातील शेतकऱ्यांना वसईच्या यात्रेनिमित्त अर्थार्जनाचा मार्ग मिळाला आहे..Konkan Tourism : पावसाळा आणि आपलं कोकण! 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या.अवकाळी पावसाचा फटका बसला. या शेतमालाचा भाव वधारला आहे, परंतु विक्रेत्यांनी ग्राहकांना सकस पौष्टिक खाद्य मिळावे, यासाठी विक्रीसाठी दुकानात ठेवली आहेत. त्यामुळे जंक फूडपेक्षा अधिक चांगली, चविष्ट आणि आरोग्यदायी कंदमुळांना पसंती दिली जात आहे..Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.यात्रेच्या निमित्ताने फायबर, जीवनसत्त्व, रोगप्रतिकारशक्तीत वाढ याबाबतची माहितीसह फायदे तरुणाईला ज्ञात होऊ लागले आहेत. आठवे श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पावले वळली आहे. या यात्रेत मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील नागरिक भटकंती करू लागले आहेत..कंदमुळांचे भाव (प्रतिकिलाे)कनक२००कोनफळ१५०सुकेळी७००रताळी१००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.