Agricultural Protest: राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन रविवारी (ता. १४) तिसऱ्या दिवशीही सुरू राहिले. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला..या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी मंत्री सुनील केदार, सलील देशमुख, महादेव जानकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत पवार यांना पाठिंबा जाहीर केला..Rohit Pawar: मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही : रोहित पवार.दरम्यान, अन्नत्याग आंदोलनामुळे रोहित पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती वैद्यकीय सल्लागार डॉ. योगेश रणदिवे यांनी दिली. रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब कमी झाल्याने सलाइन घेण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी पवार यांनी त्यास नकार दिल्याचे रणदिवे यांनी सांगितले..प्रशासनाकडून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली असून, कर्जमाफीबाबत वरिष्ठ स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य झाल्याची घोषणा करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका पवार यांनी कायम ठेवली आहे. सोमवारपासून संत नामदेव पायरीजवळ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.