ठळक मुद्देसरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २,२१५ कोटी रुपये मंजूरही मदत कोणत्या दराने दिली हे सांगायला हवे? रोहित पवारांचा सवालएकरी ३४०० रुपयांत काय होणार आहे? .Maharashtra Heavy Rains Crop losses : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २,२१५ कोटी रुपये मंजूर केले. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. .आतापर्यंत ३१,६४,००० शेतकऱ्यांना २,२१५ कोटींची मदत मंजूर झाली आहे. त्यापैकी १,८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित केले आहेत. पुढील ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावरुन कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी, ही मदत कोणत्या दराने दिली हे सांगायला हवे? असा मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. .''३१.५ लाख शेतकऱ्यांना २,२१५ कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी ७ हजार रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ८५०० प्रति हेक्टर म्हणजेच ३,४०० रुपये एकरी याप्रमाणे देण्यात आली. एकरी ३,४०० रुपयांत काय होणार आहे? तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा २० लाखांचा आणि आमच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी ३४०० रुपये मदत… एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का?,'' अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारला सवाल केला आहे..CM Devendra Fadnavis Solapur Visit : नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन .मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी ५० हजार रुपये मदत देणार की नाही, यावर बोलायला तयार नाहीत. आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी…!, अशी मागणी त्यांनी केली आहे. .अतिवृष्टीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे २५० हून अधिक वीजेचे खांब भुईसपाट झाले. काही ठिकाणी डीपीही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्याचा अनेक भागात खोळंबा झालाय. पिण्याच्या पाण्यासाठीही पंप सुरु करता येत नाहीत, मोबाईलची चार्ज करता येत नाहीत. त्यामुळे लोकांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत माहिती घेतली असता यापूर्वी केलेल्या विजेच्या विविध कामांचीच बिले सरकारने न दिल्याने कंत्राटदार आता दुरुस्तीची आणि नवीन कामे करण्यास तयार नाहीत. या बाबीकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी विनंती त्यांनी केली आहे..Devendra Fadanvis: दिवाळीपूर्वीच मदत, टंचाईच्या काळातील सवलती; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी दरम्यान, रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील खर्डा, तरडगाव, जायभायवाडी (ता. जामखेड), सितपूर, नागापूर, नागलवाडी, निंबोडी, मलठण (ता. कर्जत) या भागातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकरी आज अडचणीत आहे आणि याप्रसंगी त्याला धीर देण्याची नितांत गरज आहे. या भेटीतून बळीराजाशी चर्चा केली आणि या संकटातून सावरण्यासाठी धीर दिला, असे त्यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.