Railway Modernization: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. .या योजनेत जिल्ह्यातील रोहा आणि पेण रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.सुनील तटकरे यांनी रविवारी (ता. २) रोहा रेल्वे स्थानकाची पाहणी केली..Solapur Logistics Hub: सोलापूर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनणार.दोन्ही स्थानकांच्या विकासासाठी प्रत्येकी २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली..Kisan Rail Service: सोलापुरातून ‘किसान रेल्वे’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय.रोहा रेल्वे स्थानकाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून, रेल्वे विभागाच्या स्टँडर्ड सिस्टीमनुसार स्थानक परिसराचा विकास केला जाणार आहे..दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रिक्षा स्टँड, प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, सुशोभीकरण तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.