Pune News: पीएम-कुसुम योजनेमुळे राज्यात ग्रामीण भागात सौरऊर्जेचा वेगाने विस्तार होत आहे. मात्र, धूळ साचल्यामुळे सौर पॅनेलच्या वीजउत्पादनावर परिणाम होत असल्याच अलीकडच्या काळात दिसून आलं. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक शेतकरी आणि सौर विकसक रोबोटिक पॅनेल स्वच्छता प्रणालीकडे वळत आहेत. या आधुनिक पद्धतीमुळे खर्च कमी होऊन वीजउत्पादन स्थिर ठेवण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे..धुळीमुळे सौर वीजउत्पादनावर मोठा परिणाम…महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि राजस्थानमधील कुसुम प्रकल्प प्रामुख्याने कोरड्या भागात आहेत. या भागांत धूळ साचल्यामुळे सामान्य स्थितीत ५ ते ७ टक्के, तर उन्हाळ्यात १० ते २० टक्क्यांपर्यंत वीजउत्पादन कमी होते. त्यामुळे प्रकल्पांची क्षमता टिकवण्यासाठी नियमित स्वच्छता गरजेची ठरत आहे..Solar Cleaning Drone: सौर ऊर्जा प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी ड्रोन विकसित.पारंपरिक स्वच्छता पद्धती खर्चिक आणि अपुऱ्या…आतापर्यंत वापरली जाणारी स्वच्छता पद्धत ही खर्चिक, पाण्यावर अवलंबून आणि मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. एका मेगावॅटसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि स्वच्छता उशिरा झाल्यास वीजउत्पादनात मोठी घट होते..Robot in Animal Husbandry: रोबोटच्या मदतीने गोठा व्यवस्थापन करणं शक्य आहे का?.रोबोटिक स्वच्छतेमुळे कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ…यावर उपाय म्हणून रोबोटिक सौर पॅनेल स्वच्छता पुढे येत आहे. ही पद्धत पाण्याशिवाय स्वच्छता करते, खर्च कमी आहे आणि रोज किंवा एकाआड एक दिवस स्वच्छता शक्य होते. तज्ज्ञांच्या मते, रोबोटिक स्वच्छतेमुळे धुळीमुळे होणाऱ्या वीज तोट्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक नुकसान टाळता येते. तसेच, एका पॅनेलमागे खर्च पारंपरिक पद्धतीपेक्षा खूपच कमी येतो..पीएम-कुसुम योजनेतील कंपोनंट A (जमिनीवर किंवा उंचावर लावलेले) आणि फीडर-लेव्हल कंपोनंट C ( कृषी पंपासाठी फीडर) प्रकल्पांसाठी ही प्रणाली अधिक उपयुक्त ठरत आहे. सुरुवातीचा खर्च जरी थोडा जास्त असला, तरी दीर्घकालीन काळात देखभाल खर्च कमी होतो आणि वीजउत्पादन स्थिर राहते, असे तज्ञांचे मत आहे.वाढते मजुरी दर, पाण्याची टंचाई आणि सातत्यपूर्ण वीजउत्पादनाची गरज पाहता, येत्या काही वर्षांत महाराष्ट्रात धुळीच्या भागात रोबोटिक स्वच्छता वाढेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.