Gondia News: तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा हियांश शिवशंकर रहांगडाले या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर जंगला लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खडकीसह सुकडी डाकराम, पिंडकेपार, खमारी, बाळापूर, आलेझरी, बेरडीपार व खुर्शीपार या गावांमध्ये नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून वावरत आहेत. सायंकाळी सहा वाजल्यानंतर रस्ते ओस पडत आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे..शुक्रवारी (ता. ९) सकाळी साडेसातच्या सुमारास घराजवळ खेळत असलेल्या हियांशवर बिबट्याने अचानक हल्ला केला. काही क्षणांतच ही घटना घडल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण गाव हादरून गेले. या घटनेचा धसका घेत अनेक कुटुंबांनी मुलांना घराबाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे..Leopard Terror: पारनेर तालुक्यात महिनाभरात पकडले नऊ बिबटे.शाळा, खेळणी, मैदाने ओस पडली असून प्रत्येक हालचालीकडे भीतीने पाहिले जात आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. .Leopard Terror: पर्यटन हंगामात बिबट्याचा गोंधळ.काही दिवसांपूर्वी निमगाव इंदोरा येथेही एका लहान मुलावर हल्ला झाला होता. जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाने वेळेत पिंजरे, गस्त व प्रभावीबंदोबस्त न केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत..दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाची रेस्क्यू टीम ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेत असून रात्रंदिवस गस्त सुरू आहे. मात्र अद्याप त्याचा सुगावा लागलेला नाही. भीतीमुळे शेतकरी एकटे शेतात जाणे टाळत आहेत, तर जनावरे चरायला नेतानाही गटाने जात आहेत. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.