Junnar News : पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग जुन्नर तालुक्यातूनच जावा, या मागणीसाठी ओतूर (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. १४) अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेे..या वेळी हजर असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, देवराम लांडे, माऊली खंडागळे, पांडुरंग पवार, अनंतराव चौगुले, विशाल तांबे, प्रकाश ताजणे, शरद चौधरी, भगवान घोलप, अंकुश आमले, मोहित ढमाले, तुषार थोरात, दिलीप डुंबरे, संभाजी तांबे, सरपंच डॉ. छाया तांबे, प्रियांका शेळके, प्रांजल भाटे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता..या वेळी प्रशासनाला देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार एन.बी.गवारी, मंडलाधिकारी विश्वनाथ शिंदे, तलाठी अंकुश सुपे यांनी स्वीकारले. निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी प्रथम तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर सन १९९५-९६ मध्ये भारतीय रेल्वे बोर्डमार्फत पुणे, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर, नाशिक रेल्वे लाइनचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला..Farmers Protest: प्रकल्पग्रस्त शेतकरी आज देणार विधान भवनावर धडक.डीपीआर व सर्व्हे याबाबत सातत्याने आवाज उठविला गेला व त्यामुळे डीपीआर व सर्व्हे सुरू ठेवण्यात आला. त्यांचे मोठे योगदान दिले आहे. सन २०१९ पासून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत व सार्वजनिक मंचावर आवाज उठवून रेल्वे मंजुरी डीपीआरसाठी केंद्र सरकारसमोर मागणी केली आहे. पत्रव्यवहार केला आहे. जीएमआरटीचा अडथळा दूर करण्यासाठी तांत्रिक समाधान शोधणे किंवा जीएमआरटी स्थलांतरासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आवाज उठवून पत्रव्यवहार केलेला होता..प्रस्तावित रेल्वे मार्ग हा जीएमआरटी या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक प्रकल्पाच्या रेडिओ क्षेत्रातून जात असल्यामुळे तसेच रेल्वे इंजिन ओव्हर हेड इलेक्ट्रिक लाइन, सिग्नल यामुळे रेडिओ लहरींमध्ये व्यत्यय निर्माण होणार असल्यामुळे केंद्र सरकारने हा जुन्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रद्द करून शिर्डी-अहिल्यानगर या नवीन मार्गाने रेल्वे होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिवाळी अधिवेशनात खासदार अमोल कोल्हे यांनी विचारलेल्या प्रश्नावर जाहीर केले..Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गे होण्यासाठी आंदोलनाचा निर्णय.तालुक्यात संतापाची लाटप्रस्तावित रेल्वे लाइनमुळे जनतेचा प्रवास स्वस्त, सुरक्षित होऊन वेळेची बचत झाली असती. शेतमालाकरिता मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असती. उद्योगाला, रोजगाराला, पर्यटनास चालना मिळाली असती. शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुलभ झाल्या असत्या. जमिनीचे मूल्य वाढले असते. गावांचा विकास झाला असता; परंतु हा प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द केल्याने तालुका विकासापासून वंचित राहणार आहे, अशा शब्दांत जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.....अन्यथा लोकभावनेचा उद्रेकजुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातून रेल्वे लाइन नेण्याचा अथवा भूमिगत रेल्वे लाइनचा विचार व्हावा. अन्यथा जीएमआरटी येथून स्थलांतरित करावी. रेल्वेमार्ग पुणे, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर, नाशिक असाच असावा. अन्यथा या भागातील लोकभावनेचा उद्रेक होऊन जनआंदोलन उभे राहील, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.