Latur News: लातूर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, घरणी व तावरजा नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी यंदाच्या अतिवृष्टीत खरडून गेल्या असून, अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे पूरग्रस्त बाधित शिल्लक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. .लातूर जिल्ह्यातील शेतकरी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या अस्मानी संकटांचा सातत्याने सामना करत आहेत. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा, तेरणा व तावरजा नद्यांना अनेक वेळा मोठा पूर आला. लातूर, निलंगा, औसा, देवणी, शिरूर अनंतपाळ आदी तालुक्यांतील नदीकाठच्या शेती क्षेत्रात पाणी शिरून खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर तसेच उसाची पिके पूर्णपणे नष्ट झाली..या पुरात केवळ पिकेच नव्हे तर सुपीक मातीही वाहून गेली. अनेक ठिकाणी नदीचे पात्र बदलले, शेतांमध्ये मोठे खड्डे पडले आणि जमिनी शेतीयोग्य राहिल्या नाहीत. रब्बी हंगामासाठी जमीन कशी तयार करावी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला होता. .त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपयांचे विशेष अनुदान जाहीर केले. मात्र ही मदत केवळ दोन हेक्टरपर्यंतच देण्याचा निकष निर्णयात ठेवण्यात आला. .Farmer Compensation: हातकणंगलेतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना २० लाखांची मदत वाटप.ऑगस्ट-सप्टेंबरमधील पीक नुकसानीत ग्रामस्तरीय समितीने दोन हेक्टरपर्यंतचे सर्व क्षेत्र नोंदविल्याने बहुतांश शेतकऱ्यांना पीक नुकसान अनुदान मिळाले..Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत.मात्र याच कारणामुळे दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचे स्वतंत्र अनुदान मिळण्यात अडचणी येत आहेत..एका शेतकऱ्याला एका हंगामात दोन हेक्टरच्या आत एकच लाभ देता येईल, या शासन निर्णयामुळे पीक नुकसान व जमीन खरडणी असे दोन लाभ एकत्रितपणे दोन हेक्टरच्या पुढे जात असल्याने अनेक नदीकाठचे शेतकरी वंचित राहत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.