नदी सुधारायची म्हणजे कोट्यवधींचे प्रकल्पच हवेत असा गैरसमज आहे. अनेक ठिकाणी साध्या उपायांनीही मोठा फरक पडतो. सांडपाणी नदीत जाणं थांबवणे हे पहिले पाऊल आहे. घरगुती सांडपाणी, बाजारपेठेचे पाणी, डेअरी/लहान उद्योगांचे पाणी हे थेट नदीत जाऊ देऊ नये. सोक पीट, फिल्टर बेड, नैसर्गिक शुद्धीकरण, स्थानिक पातळीवर प्रक्रिया हे उपाय करता येतात..नदीपात्र आणि पूरमैदान मोकळे ठेवावे. नदीला जागा दिलेली नसल्याने पूर येतो.अतिक्रमण, भराव, अनधिकृत बांधकाम या गोष्टी नदीचा श्वास रोखतात. यासाठी स्थानिक संस्थांनी कडक पाऊले उचलली पाहिजेत. नदीच्या सीमांकनाचा आग्रह धरून नद्या अधिसूचित करून घेणे आवश्यक आहे.नदीकाठावर स्थानिक झाडांची लागवड करावी. गवत, झाडं माती धरून ठेवतात, धूप रोखतात, ओलावा टिकवतात. नदीकाठावर हरित पट्टा तयार झाला तर नदीला नैसर्गिक संरक्षण मिळते.पाणी बचत आणि पुनर्वापर वाढविणे आवश्यक आहे. घर, संस्था, बाजारपेठ, जेथे शक्य आहे तेथे पाणी बचत आणि काही प्रमाणात पुनर्वापर सुरू केला तर मागणी कमी होते आणि नदीवरचा ताण कमी होतो..River Rejuvenation : नदी शुद्धीकरणाचे ‘ग्रीन ब्रिज’ तंत्रज्ञान.उमेदवाराला विचारा प्रश्न...आज निवडणूक म्हणजे फक्त मत देणे नाही. निवडणूक म्हणजे आपल्या गावाच्या नदीच्या भवितव्याचा निर्णय आहे. म्हणून उमेदवाराला नागरिकांनी खालील विचारावेत:आमच्या नदीत सांडपाणी जाणं तुम्ही थांबवणार का?सांडपाणी व्यवस्थापनासाठी तुमची ठोस योजना काय?नदीकाठ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तुम्ही काय करणार?उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी भूजल वाढवण्याचे उपाय?नदीत वाळू/मुरूम उपसा अनियंत्रित असेल तर रोखणार का?ग्रामीण आणि नागरी संस्था एकत्र आणण्यासाठी तुमचा समन्वयाचा प्रस्ताव काय?निवडून आल्यावर नदी आणि पाण्याला तुमच्या कामाच्या अजेंड्यात पहिलं स्थान देणार का?.शेवटी निवडून यायचे कशासाठी, हे ठरवा!निवडणूक म्हणजे केवळ पद मिळवणे नाही. निवडणूक म्हणजे सेवेची संधी आहे. लोकप्रतिनिधी होणे म्हणजे गावाच्या भविष्याची चावी हातात घेणे आहे.आज अनेकदा निवडणुकीत वैयक्तिक स्वार्थ पुढे येतो जसे की नाव, सत्ता, प्रतिष्ठा, प्रभाव. पण खरं समाधान आणि आयुष्याचं सार्थक मिळते, जेव्हा आपण सामूहिक भल्यासाठी काम करतो. वैयक्तिक स्वार्थापेक्षा सामूहिक स्वार्थ कधीही सरस ठरतो.नदी वाचवली तर फक्त आजचे मतदार नाही, तर पुढच्या पिढ्यांचेही आशीर्वाद मिळतात. नदी जिवंत ठेवणे म्हणजे भविष्याला सुरक्षित करणे होय..River Pollution Control : नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण.नदी वाचली तरच आपण !नदी कुण्या एका गावाची नाही. नदी सगळ्यांची आहे. नदीचा प्रवास अखंड आहे, त्यामुळे संरक्षणही अखंड हवे. ग्रामपंचायत असो किंवा महानगरपालिका, सर्वांनी नदीसाठी एकत्र यायलाच हवे. ७३वी आणि ७४वी घटना दुरुस्तीतील तरतुदींचे भान ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले विहित कार्य केले, तर नदी वाचू शकते, पाणी टिकू शकते आणि विकास शाश्वत होऊ शकतो..या निवडणुकीत आपण ठरवूया...नदीला नाला बनवायचे नाही,नदीत घाण पाणी सोडायचे नाही,नदीला तिची जागा द्यायची.ग्रामीण-नागरी समन्वय मजबूत करायचा,आणि आपल्या गावांची जीवनवाहिनीसुरक्षित ठेवायची,कारण नदी वाचली तरच आपण वाचणार!.River Linking: नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राला मदतीचे साकडे.शाश्वत विकासाचे ध्येयपंचायती राज संस्थांना ७३ वी घटनादुरुस्ती १९९२ द्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आला, ज्याने तळागाळातील प्रशासनात आमूलाग्र घडून आणण्याचे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात अकराव्या अनुसूचित नमूद केलेल्या २९ विषयांपैकी केवळ ४० टक्के विषय (१२) प्रत्यक्षपणे पंचायतराज संस्थांकडे हस्तांतरित झाल्याचे आढळते. शेती, पिण्याचे पाणी, दारिद्र्य निर्मूलन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर अजूनही प्रशासनाची पकड आहे. ग्रामसूचीतील ७८ विषय तर वेगळेच आहेत..महाराष्ट्रातील पंचायती राज संस्थांना त्यांच्या एकूण निधीपैकी ८५ टक्के पेक्षा अधिक निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळतो. स्थानिक महसूल निर्मिती अत्यंत अल्प आणि मर्यादित आहे. राज्य वित्त आयोगाच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या शिफारशीदेखील अजून पूर्ण व्हायच्या आहेत, त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या अजूनही समृद्ध नाहीत.नियमित ग्रामसभा होणे आणि कोरम अभावी ग्रामसभा तहकूब होणे हेही प्रमाण सुमारे ५५ टक्के एवढे आहे. यामुळे खऱ्या अर्थाने लोकसहभागी स्थानिक प्रशासन या संकल्पनेला छेद जातो..River Conservation: शाश्वत नदी व्यवस्थापनासाठी ग्रामीण-नागरी समन्वय हवाच!.विशेषतः आदिवासी आणि विरळ लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना योग्य ते प्रशिक्षण न मिळाल्यामुळे त्याचा थेट परिणाम ग्राम प्रशासनामध्ये दिसून येतो.महाराष्ट्रामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजनेपासून महिला स्वयंसाह्यता गटांची चळवळ मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आता उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिला स्वयंसाह्यता गटांचे ग्रामसंघ स्थापन झाले आहेत. या कुशल मनुष्यबळाचा वापर ग्रामप्रशासनामध्ये करणे हे अपरिहार्य झाले आहे. केरळच्या ‘कुटुंब श्री’ मॉडेलचा या ठिकाणी वापर करता येऊ शकेल किंवा कसे याबाबतही चाचपणी होणे आवश्यक वाटते..विकसित महाराष्ट्र २०४७ च्या पहिल्या टप्प्यामध्ये २०२९ या काळातील पंचवार्षिक टप्पा येतो आणि २०३० मध्ये शाश्वत विकासाचे ध्येय यांच्या पूर्णत्वाचा कालावधी संपतो. त्यामुळे शाश्वत विकासाच्या ध्येयांची ग्रामपंचायतीपर्यंतचे अंमलबजावणी गुणवत्ता पूर्ण होणे गरजेचे आहे. विशेषतः एचडीजीच्या ध्येय क्रमांक सहा प्रमाणे जल आत्मनिर्भरता आणि ध्येय १३ प्रमाणे हवामान बदल अशी संलग्नता यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.जैवविविधता आणि पर्यावरण रक्षण हा बऱ्याच ग्रामपंचायतींच्या अजेंड्यावर नाही. परंतु हा विषय अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक ग्रामपंचायत निहाय जैवविविधतेचा अभ्यास आणि त्याचे जतन होणे गरजेचे आहे, यासाठी निधीची कमतरता असल्यास तो निधी आणि कायद्यामध्ये काही सुधारणा करावयाचे असल्यास तेही करणे पहिल्या टप्प्यांमध्ये शक्य होईल, म्हणजे उर्वरित २०३५ ते २०४७ पर्यंत ध्येय गाठणे शक्य होऊ शकेल..विकासासाठी लोकसहभागसमाजामध्ये अत्यंत सकारात्मकदृष्टीने काम करणारे आणि चांगल्या कामावर विश्वास ठेवणारे अनेक जण आहेत. हेच ग्रामपंचायतीचे शक्तिस्थान आहे. वैरभाव, एकमेकांबद्दलचा आकस, विरोध ही समाजाला न भावणारी गोष्ट आहे. शांती आणि समृद्धी हे आपल्या भारतीय समाजाचे मानक आहे; आणि हेच चिरंतन आहे.गट, पक्ष हे विसरून सर्व निर्वाचित सदस्य, सरपंच, आणि उपसरपंच हे एकाच विचाराने काम करणारे असतील आणि त्यांच्यामध्ये वैयक्तिक हेवेदावे नसतील तर गावाच्या स्वरूप पाच वर्षे नव्हे तर केवळ दोन वर्षांत बदलल्याचे स्पष्टपणे जाणवेल.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर जाहीरनामा निघाल्यावर पहिल्या बैठकीत उपसरपंचाची निवड होते. या बैठकीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा एक संघ निर्माण होईल.लोकसहभाग आणि समाजाने केलेले काम शाश्वत आणि चिरंतन असते. कारण त्यामध्ये लोकांच्या गरजा प्रतिध्वनित होतात. हे काम माझे आहे आणि माझ्या गावासाठीचे आहे, हे केवळ माझेच नव्हे तर संपूर्ण गावाचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.