डॉ. गणेश कोटगिरे, जी. ई. अत्रे, डॉ. ए. डी. कडलगपावसाळी हंगामात तसेच पावसाळ्यानंतर ऊस पिकाच्या पानांवर हवेद्वारे पसरणारे तपकिरी तांबेरा, पोक्का बोंग, तपकिरी ठिपके, गवताळ वाढ या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाची उपाययोजना करावी..पोक्का बोंगपोक्का बोंग हा रोग फुजॅरियम मोनिलीफॉरमी/ सॅकाराय या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे होतो. को- ४१९, कोसी- ६७१, व्हीएसआय-४३४, को-८६०३२, एमएस-१०००१ आणि कोव्हीएसआय-९८०५ या जातींवर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो.लक्षणेबुरशीचा प्रादुर्भाव झाल्यावर सुरवातीस तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट - पिवळसर पट्टे दिसून येतात.पानांवर सुरकुत्या पडून पाने आकसतात, त्यांची लांबी घटते. पाने सडतात, त्यानंतर गळून पडतात.रोगाची तीव्रता वाढल्यामुळे पोंगा मर किंवा शेंडाकुज दिसून येते. काही वेळेस रोगग्रस्त कांड्यांवर कांडी काप (नाइफ कट)सारखी लक्षणे दिसून येतात. रोगाचा प्राथमिक प्रसार हवेमार्फत, तर दुय्यम प्रसार पाणी, पाऊस व कीटकाद्वारे होतो.नियंत्रणाचे उपायखतांची मात्रा माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात योग्य वेळी द्यावी.प्रादुर्भाव झालेल्या शेतातील शेंडेकुज झालेले व पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढून जाळून नष्ट करावेत.फवारणी (प्रति लिटर पाणी)कॉपर ऑक्झिक्लोराइड २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम.Sugarcane Disease Control : उसावरील लाल कुज नियंत्रण.तांबेराको-४१९, कोसी- ६७१, कोव्हीएसआय- ९८०५, को- ९२००५, एमएस- १०००१,को-८६०३२, व्हीएसआय-४३४ आणि कोएम- ०२६५ या जातींवर प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर दिसतो.स्फुरद, पालाश जास्त असणाऱ्या जमिनीतील उसामध्ये रोगाची तीव्रता जास्त आढळून येते.लक्षणेसुरुवातीस पानांवर लहान व लांबट पिवळे ठिपके पानाच्या खालच्या बाजूस दिसून येतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढते, त्यांचा रंग लालसर तपकिरी किंवा तपकिरी दिसून येतो. ठिपक्यांचा भाग बुरशी आणि बीजाणूंच्या वाढीमुळे फुगीर होतो. पानांचा ठिपक्यालगत भाग फुटून त्यातून नारिंगी किंवा तांबूस-तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात.रोगग्रस्त पानाच्या पाठीमागच्या पृष्ठभागावरून बोट फिरविले असता बीजाणूची पावडर सहजपणे बोटास चिकटते.नियंत्रणाचे उपायप्रादुर्भाव जास्त असणाऱ्या भागात मध्यम रोगप्रतिकारक जातींची (को व्हीएसआय- ०३१०२, व्हीएसआय- ०८००५) लागवड करावी.खतांची मात्रा माती परीक्षणानुसार योग्य वेळी द्यावी. नत्रयुक्त खताचा तसेच इतर खतांची मात्रा उशिरा देऊ नये. पावसाळ्यात शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.फवारणी (प्रति लिटर पाणी)प्रोपिनेब २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम.Sugarcane Disease : ऊस पिकावर तांबेरा, करपा रोग.पानांवरील तपकिरी ठिपकेरोगाचा प्रादुर्भाव कोएम-०२६५ आणि को-८६०३२ या जातीवर जास्त प्रमाणात दिसतो.पावसाळा संपताना रोगाची तीव्रता वाढते. पक्वतेच्या काळात प्रादुर्भाव वाढत असल्याने साखर निर्मितीच्या प्रक्रियेत घट येऊन उतारा व उत्पादन घटते.लक्षणेपानावर झाल्याने लाल-तपकिरी रंगाचे ठिपके उसाच्या पानांवर दिसून येतात. पानावरील ठिपके अंडाकृती किंवा लंबगोलाकार असून त्यांच्या सभोवतालचा भाग पिवळा दिसतो. सामान्यपणे पानाच्या दोन्ही बाजूंस ठिपके सारखेच दिसतात. उसाच्या कोवळ्या पानांपेक्षा जुन्या पानांवर ठिपके जास्त प्रमाणात दिसतात; तसेच ठिपके पानांवर सर्वत्र सारख्या प्रमाणात विखुरलेले आढळतात.रोगाची तीव्रता वाढल्यावर ठिपके पानाचा पूर्ण भाग व्यापतात आणि ते एकमेंकात मिसळतात. त्यानंतर पाने पूर्णपणे करपतात आणि वाळतात. प्रकाश संश्लेषण आणि साखर निर्मिती मंदावते.नियंत्रणाचे उपायलागवडीसाठी बेणेमळ्यातील बेणे वापरावे. रोगग्रस्त शेत तसेच खोडवा पिकातून बेणे घेऊ नये.रोगग्रस्त पीक कापणीनंतर उरलेले पाचट जाळून नष्ट करावे. पीक फेरपालट करावी.सुरुवातीच्या टप्प्यात पाण्याचा ताण पडू देऊ नये. पावसाळ्यात शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खताची मात्रा माती परीक्षणानुसार वेळेवर द्यावी.फवारणी (प्रति लिटर पाणी)कॉपर ऑक्झिक्लोराइड २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम.गवताळ वाढको- ४१९, कोसी- ६७१, कोएम- ०२६५, को- ८६०३२ या जातींवर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो.पीक वाढीच्या सर्व अवस्थेत प्रादुर्भाव आढळतो. प्रसार मुख्यत्वे करून दूषित बेणे व किडीद्वारे होतो.लक्षणेसुरुवातीच्या काळात बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसतात. बेटास गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते.पानामध्ये हरितद्रव्य कमी प्रमाणात तयार होत असल्याने पाने पिवळी किंवा पांढरी पडतात.पाने अरुंद व आखूड होतात. पूर्ण वाढ झालेल्या उसास रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्यातील पाने पिवळी पडतात, कांड्यावरील डोळ्यातून पिवळसर पांगशा फुटतात. रोगट ऊस नंतर पोकळ पडतो व वाळतो.खोडवा पिकात रोगामुळे जास्त प्रमाणात बेटे पिवळी पडतात. उसांची संख्या घटते.नियंत्रणाचे उपायबेणेमळ्यातील बेणे लागणीसाठी निवडावे. बेणेमळ्यासाठी मूलभूत बेणे तयार करण्यासाठी लागवडीपूर्वी ऊस बेण्यास बाष्प उष्ण हवा प्रक्रिया ५४ अंश सेल्सिअस तापमानास १५० मिनिटे करावी.उगवण झाल्यानंतर नियमितपणे पाहणी करून रोगट बेटे मुळासहित काढावीत व जाळून नष्ट करावीत.सामूहिक पद्धतीने बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यास नियंत्रण प्रभावीपणे करता येईल.रोगाच्या प्रसार करणारी पांढरी माशी, मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड०.३२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डॉ. गणेश कोटगिरे ९९६०८३३३०१(ऊसरोग शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.