Brucellosis Disease: ब्रुसेलोसिस हा ब्रुसेला जीवाणूमुळे होणारा गंभीर आणि संक्रामक आजार असून, तो गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, श्वान यांसारख्या पशुधनातून थेट माणसांमध्येही पसरू शकतो. राज्यभरात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून, प्राण्यांमध्ये गर्भपात, वंध्यत्व आणि प्रजननाच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.