Sangali News: वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील शेतविहिरींवरील विद्युत मोटारी चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. या घटनांचा तपास लागण्याआधीच आता पाणीपुरवठा संस्थेच्या मोठ्या केबल वायर चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे..कधी विद्युत मोटारी, तर कधी विद्युत वायर चोरीस जाण्याच्या सततच्या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या चोऱ्यांना आळा कोण घालणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे..Soybean Farmer Issue: सोयाबीन उत्पादकांचे नुकसान होणार : जयराम रमेश.येथील हनुमान वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे जॅकवेल वारणा नदीकाठी असून, या संस्थेमार्फत सुमारे २०० ते ३०० एकर ऊस पिकाला पाणीपुरवठा केला जातो. जॅकवेलवर दोन ते तीन विद्युत मोटारी बसविण्यात आल्या असून त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी उच्च दर्जाच्या केबल वायरचा वापर करण्यात आला होता..Onion Farmer Issue: कांदा उत्पादक पुन्हा संकटात.या केबलची बाजारभावानुसार किंमत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. मंगळवारी (ता. १०) रात्री १० ते १२ या वेळेत जॅकवेलवरील मोटारींना वीजपुरवठा करणाऱ्या केबल वायर चोरीस गेल्याचा प्रकार घडला. मध्यरात्री वीजपुरवठा सुरू होणार असल्याने ऑपरेटर मोटारी सुरू करण्यासाठी गेले असता त्या सुरू होत नव्हत्या..स्विच वारंवार सुरू करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तपासणी केली असता केबल वायर कापून नेल्याचे निदर्शनास आले. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच परिसरात शोध घेतला; मात्र वायरचा कोणताही मागमूस लागला नाही. सुमारे ५०० मीटर लांबीची केबल कापून नेण्यात आली असून त्यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.