ऋतुजा कदम, डॉ. अनुप्रिता जोशीआजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य सांभाळण्यासाठी सकस आणि संतुलित आहार अत्यावश्यक आहे. आहारात दररोज एक तरी फळाचा समावेश करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. फळांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. .त्याचप्रमाणे फळांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळपण देतात, केसांचे पोषण करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. अनेक फळांमध्ये भरपूर पाणी असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. विशेषतःउन्हाळ्यात फळांचे सेवन केल्याने डिहायड्रेशनपासून बचाव होतो. दररोज फळं खाणे म्हणजे केवळ चव घेणे नाही, तर शरीराला पोषण, संरक्षण आणि ऊर्जा देण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक ऋतूमध्ये त्या काळात तयार होणारी फळे खाणे उपयुक्त ठरते.फळांची प्रक्रिया करून त्यांच्या टिकवण क्षमतेमध्ये वाढ करता येते. प्रक्रिया केलेल्या फळांमुळे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.जसे की रस, जाम, जेली, स्क्वॅश, लोणची, सिरप, सुके फळ, पावडर, पेये इत्यादी..Patanjali Fruit Processing Project : पतंजलीचा प्रकल्प शेती समस्यांचे समाधान ठरेल.आरोग्यासाठी फायदासफरचंदफळामुळे पचन सुधारतं, हृदय निरोगी ठेवतं आणि शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते.केळीऊर्जेचा चांगला स्रोत आहे, पचन सुधारते. अॅसिडिटी आणि उलट्यांसारख्या समस्यांवरही उपयुक्त ठरते.पेरूजीवनसत्त्व क चांगला स्रोत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मधुमेह असणाऱ्यांसाठीही हे फळ खूप फायदेशीर आहे.संत्री, मोसंबीजीवनसत्त्व क मुळे त्वचेचं आरोग्य सुधारते. सर्दी-खोकल्यावर प्रभावी आहे..Fruit Processing Industry : पेरूसह फळपिकांच्या प्रक्रिया उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ.पपईपचनासाठी उत्तम, वजन कमी करताना उपयोगी, त्वचेचा रंग उजळवण्यासही मदत करते.डाळिंबरक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. महिलांसाठी विशेषतः उपयुक्त. त्वचेला चमक आणि केसांना पोषण मिळते.कलिंगडउन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वोत्तम, शरीराला थंडावा देतो, किडनीचे आरोग्य सुधारते.सीताफळशरीराला ऊर्जा देते. मेंदूचे कार्य चांगले राहण्यासाठी मदत करते.आंबाजीवनसत्त्व अ ने समृद्ध, त्वचा आणि केसांच्या पोषणासाठी उपयुक्त..अंजीरहाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर. बद्धकोष्ठतेवर उत्तम उपाय.द्राक्षअँटीऑक्सिडंट्स ने भरपूर. कोलेस्ट्रॉल कमी करते, त्वचेला तजेलदार बनवते.जांभूळमधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी. पचन सुधारते, तोंडाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर.स्ट्रॉबेरीत्वचेसाठी खूप फायदेशीर. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, चेहऱ्याला उजळपणा देते..निर्जलीकरण तंत्रज्ञाननिर्जलीकरण ही एक पारंपरिक पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये फळांमधील नैसर्गिक आर्द्रता कमी करून त्यांना दीर्घकालीन साठवणुकीसाठी योग्य बनवले जाते. वाळवणासाठी पारंपरिक सावलीत वाळवण, सोलर ड्राईंग, हॉट एअर ड्राईंग, फ्रीज ड्राईंग, व्हॅक्युम ड्राईंग, ऑस्मोटिक ड्राईंग यांसारख्या पद्धती वापरल्या जातात.सोलार ड्राईंगमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून नियंत्रित तापमानात फळे सुकवली जातात. यामुळे उत्पादनात रंग, चव आणि सुगंध टिकतो. काही पद्धतींमध्ये हळद पाणी, मिठाच्या द्रावणाचा वापर करून हानिकारक जिवाणूंचा नाश केला जातो, फळांचे आयुष्य वाढवले जाते..निर्जलीकरण प्रक्रियेत ब्लांचिंग, योग्य कटिंग, सोकिंग, तापमान नियंत्रण आणि शेवटी एअर टाइट पॅकिंग हे टप्पे असतात. हे सर्व निकष योग्य प्रकारे पाळल्यास उत्पादनाची गुणवत्ता उत्तम राहते आणि बाजारपेठेत चांगला दर मिळतो.ग्राहक अधिकाधिक नैसर्गिक, सेंद्रिय व टिकाऊ अन्नपदार्थ निवडतात. त्यामुळे ड्राय फ्रुट्स, फळ पावडर, लो-शुगर किंवा शुगर-फ्री फळ उत्पादने, सुकवलेली फळे, फळांचे मिश्रित पेय, इम्युनिटी बूस्टर सिरप आणि फळ चिप्स यासारख्या उत्पादनांना बाजारपेठेत भरपूर मागणी आहे.- ऋतुजा कदम ८१४९३९४८९८(एम. टेक विद्यार्थी, अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडाकृषी विद्यापीठ, परभणी ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.