Nashik News : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाढत्या बिबट्या-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संवेदनशील मुद्द्याची गंभीर दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली असून, नाशिकसाठी स्वतंत्र ‘लेपर्ड सफारी अँड कंझर्वेशन प्रोजेक्ट’ मंजूर करावा, अशी ठोस मागणी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. .गेल्या पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ३५ हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ६२ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवहानी बरोबरच पाळीव जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले असून अधिकृत ६.१० कोटींची भरपाई वितरित करण्यात आली आहे. तरी सुद्धा बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांचे प्रमाण कमी न होता वाढतच आहे. .अलीकडेच वडनेर गेट परिसरात दोन वर्षीय बालकाच्या मृत्यूच्या घटनेने जनतेत संतापाची लाट उसळली होती. देवळालीगाव, पिंपळगाव खांब, वडनेर गेट परिसरात नागरिकांनी आंदोलन करत वनविभागाच्या अपुऱ्या पिंजऱ्यांविषयी, उशिरा प्रतिसाद देणाऱ्या पथकांविषयी आणि निष्क्रिय यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली होती..Leopard Terror : नेवासे तालुक्यातील चांदा शिवारात बिबट्याची दहशत, शेतकरी त्रस्त.एप्रिल ते जून २०२५ या काळात वनारवाडी परिसरात तब्बल तीन बिबटे पकडण्यात आले, ही घटनांची गंभीरता दर्शविते. केवळ वन्यजीव व्यवस्थापनाची बाब नसून मानवी सुरक्षा, सामाजिक समरसता आणि पर्यावरणीय संतुलन जपण्याचे आवाहन आहे, असे खासदार वाजे यांनी पत्रात नमूद केले आहे..जुन्नर पॅटर्ननुसार संघर्षातून सहजीवनाकडेखासदार वाजे यांनी पत्रात पुणे जिल्ह्यातील जुन्नर लेपर्ड सफारी प्रकल्पाचा (५२ हेक्टर क्षेत्र, ८२ कोटी खर्च, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे सादर झालेला सविस्तर प्रकल्प अहवालाचा उल्लेख केला आहे.या प्रकल्पामुळे संवर्धन, पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती एकत्र येत आहे. .Leopard Attack : शेतात आजोबांना पाणी देणाऱ्या नातीवर बिबट्याचा हल्ला.तसेच माणिकडोह रेस्क्यू सेंटर (महाराष्ट्र) आणि झलाना लेपर्ड रिझर्व्ह (राजस्थान) यांनी यशस्वी संघर्ष व्यवस्थापनाचे उदाहरण निर्माण केले आहे. ‘‘योग्य दृष्टिकोन आणि शास्त्रीय धोरणांचा वापर केल्यास भीतीचे रूपांतर सहजीवनात, आणि संकटाचे रूपांतर संधीमध्ये करता येते,’’ असे खासदार वाजे यांनी नमूद केले आहे..खासदार वाजे यांनी सुचवलेले उपायजुन्नरप्रमाणे नाशिक लेपर्ड सफारी आणि कंझर्वेशन प्रकल्प स्थापन. त्यात संवर्धन, शिक्षण, इको-टुरिझम आणि रोजगारनिर्मितीवर आधारित.बिबट्या कॉरिडॉर आणि हॉटस्पॉट्सचे मॅपिंग करून प्रतिबंधात्मक योजना आखणे.अधिक पिंजरे, प्रशिक्षित पथके आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टम तैनात करणे.शास्त्रीय संघर्ष व्यवस्थापन उपाय जसे की, स्टरलायझेशन, स्थलांतर, जीपीएस-कॉलरिंग.स्थानिक समुदायाचा सहभाग ज्यात पंचायत, शाळा व युवकांना संवर्धन भागीदार बनवणे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.