Pune News: देशात यंदा भाताची लागवड जवळपास पाच टक्क्यांनी वाढूनही उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात असलेली युरियाची टंचाई, तसेच भात पट्ट्यात पिकाचे पावसाने केलेले नुकसान यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. गेल्या वर्षी भाताचे उत्पादन जवळपास १२२ लाख टन झाले होते. ते यंदा १२० लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला..कृषी तज्ज्ञांनी राज्यनिहाय पेरणी क्षेत्र, पीक परिस्थिती आणि पावसाचे वितरण या निकषांच्या आधारावर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. “पूरस्थिती, पाऊस, खत टंचाई यामुळे पंजाबसह अनेक भागात उत्पादन कमी होऊ शकते. पंजाबमधील भात उत्पादनात किमान २० टक्के घट अपेक्षित आहे,” असे एका वरिष्ठ भात संशोधकाने सांगितले..Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका.केंद्र सरकारच्या पाच सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, खरीप भात लागवडीखालील क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी अधिक आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक १३.५ टक्के वाढ आहे. उत्तर प्रदेश हे खरीप हंगामात भात उत्पादन घेणारे सर्वात मोठे राज्य आहे. आतापर्यंत भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यात बहुतांश पीक क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यंदा सुमारे २१ दशलक्ष टन भात उत्पादन होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ एस. के. सिंह यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात २०.२४ दशलक्ष टन उत्पादन झाले होते..पंजाबमधील मोठे क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. या पार्श्वभूमीवर काही विश्लेषकांनी म्हटले आहे की, या खरीप हंगामात भात उत्पादनात किमान सहा दशलक्ष टन घट होऊ शकते. त्याचबरोबर, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही उत्पादन घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही भात शेतीवर परिणाम झाला आहे..Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव.पश्चिम बंगाल हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे खरीप भात उत्पादक राज्य आहे. येथील शेतकऱ्यांनी यंदा आतापर्यंत ४३ लाख हेक्टरवर भात लागवड केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४१.५५ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. पश्चिम बंगाल सरकारने ४२ लाख हेक्टर उद्दिष्ट ठेवले होते..पंजाबमध्ये नुकसानपंजाबमध्ये यंदा पीक लागवडीखालील क्षेत्र अधिक असले तरी पुरामुळे पिकाचे नुकसान झाले. “काही दिवस पाणी साचून राहिले तरी भाताचे पीक त्यात तग धरुन राहू शकते. पंजाबमधील नुकसान दक्षिणेकडील राज्यांमधील अधिक उत्पादनामुळे भरून निघेल. सगळीकडे पीक चांगले असल्याने उत्पादन १३५ दशलक्ष टनांपर्यंत जाऊ शकतो. पण, पंजाबमधील उत्पादनात १ ते १.५ दशलक्ष टन घट होण्याचा शक्यता आहे,” असे जाणकारांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.