Gondia News: रब्बी हंगामातील भाताची (धान) शासकीय आधारभूत केंद्रावर हमीभावाने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे २९६ कोटी रुपयांचे चुकारे थकले होते. या विरोधात ओरड झाल्यानंतर शासनाने ११४ कोटी रुपयांची तरतूद केली, मात्र त्यानंतरही १८२ कोटी रुपयांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. .पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारासह नागपूर जिल्ह्यांच्या काही भागांत खरीप आणि रब्बी हंगामात भाताची लागवड होते. या शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण मिळावे याकरिता दोन्ही हंगामांतील भाताची शासनाकडून आदिवासी विकास मंडळ तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी केली जाते. त्याकरिता शेतकऱ्यांना शासन नियमानुसार आधी नोंदणी करावी लागते..Paddy Crop Damage: हळव्या भाताचे अतोनात नुकसान.गोंदिया जिल्ह्यात रब्बी भात विक्रीसाठी ६१ हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५५,८८१ शेतकऱ्यांकडून २३ लाख ११ हजार १९९ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली. विक्री केलेल्या या भाताची एकूण किंमत ५३१ कोटी ५७ लाख रुपये आहे. यातील २९६ कोटींचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. शेतकरी सातत्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळाच्या संपर्कात होते. परंतु शासनाकडूनच निधीची उपलब्धता होत नसल्याने त्यांची पुरती निराशा झाली होती..Paddy Crop Damage : भाताच्या कोठारावर अस्मानी संकट .या विरोधात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्याचीच दखल घेत शासनाने थकित चुकाऱ्यांपोटी फेडरेशनला ११४ कोटी ६ लाख ६६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु त्यानंतर देखील १८२ कोटी रुपयांचे चुकारे थकित असल्याने शासनाच्या या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला आहे. शासनाने तत्काळ निधीची उपलब्धता करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी फोडावी, अशी मागणी आहे..बाजारात दर कमी असल्याने शेतकरी आधारभूत केंद्रांवर शेतीमालाची विक्री करतात. विक्रीनंतर मिळालेल्या पैशांतून देणीदारांची देणी चुकविली जातात त्याचबरोबर नव्या हंगामाकरिता तरतूद होते. त्यामुळे शासनाने शेतीमालाचे चुकारे वेळीच केले पाहिजेत. जगदीश नरवाडे, अध्यक्ष, जनआंदोलन संघर्ष समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.