Pune News: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने भात खाचरे भरून वाहत आहेत. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळत असून भात पिके चांगलीच तरारली आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास भात पिकांचे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी शक्यता कृषी विभागाच्या सुत्रांना आहे. .पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव ही तालुके भात पिकांची तालुके म्हणून ओळखली जातात. या तालुक्यात अनेक शेतकरी विविध वाणाच्या भात लागवडी करतात. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने भाताची लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी चार सूत्री पद्धतीने लागवडी केल्या आहेत. आत्तापर्यंत पावसाचे तीन महिने पूर्ण झाले असून पश्चिम पट्यात चांगला पाऊस झाला..Pune Heavy Rain: मुसळधार पावसामुळे भातरोपे तरारली.चालू वर्षी मे महिन्यापासून पावसाचे प्रमाण अधिक होते. परंतु सततच्या पावसामुळे रोपवाटिका टाकण्यास अडचणी आल्या होत्या. जूनच्या अखेरीस पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे भात लागवडी वेळेवर झाल्या. जिल्ह्यात सरासरीच्या ६१ हजार १०१ हेक्टरपैकी ५९ हजार ७९१ हेक्टर म्हणजेच ९८ टक्के लागवडी झाल्या आहेत. त्यानंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. त्यामुळे भात पिकांना पावसाची प्रतिक्षा लागून होती..Paddy Farming : डहाणूत बळीराजा सुखावला .अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे भात पिकांना आधार मिळत असला तरी जोरदार पावसाची गरज होती. चालू ऑगस्ट महिन्यात महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर २४ ऑगस्टच्या दरम्यान पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून मागील तीन दिवसापासून पुन्हा पावसास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला असून अजूनही भातपट्यात तुरळक सरी बसत आहेत..पुणे जिल्हयात झालेल्या भात लागवडी, हेक्टरमध्येतालुका सरासरी क्षेत्र भात लागवड क्षेत्र टक्केहवेली २०६४ २१८४ १०६मुळशी ७६६० ७२५५ ९५भोर ७५०० ७४६० ९९मावळ १२,९५० १२,४९० ९६वेल्हे ५०२५ ५००२ १००जुन्नर ११,१२९ १०,८४३ ९७खेड ७७५० ५९०४ १०३आंबेगाव ५७३७ ५९०४ १०३दौंड ० ४२एकूण ६१,१०१ ५९७९५ ९८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.