NDRF Criteria : 'एनडीआरएफ'चे जुने निकष बदला आणि शेतकऱ्यांना भरीव मदत द्या; मदतीची मर्यादा वाढवण्याची मागणी!
Farmer Relief Fund : नांदेड जिल्ह्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याने नुकसानग्रस्तांना ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित दरात वाढ करुन भरीव आर्थिक मदत मंजूर करावी. तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.