Maharashtra Revenue : नाशिक पीक पाहणीवेळी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची अचूक नोंद घ्यावी. क्षेत्राची योग्य माहिती घेताना उपलब्ध नोंदींमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. तसेच, पीक पाहणीदरम्यान येणाऱ्या तांत्रिक व क्षेत्रीय अडचणींची माहिती घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी पीक पाहणी सहाय्यकांना दिल्या..निफाड तालुक्यातील चांदोरी व पिंपळस येथे हेमांगी पाटील यांनी मंगळवारी (ता. ६) प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांनी ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत मोबाईल ॲपद्वारे सुरू असलेल्या पीक पाहणी नोंदणीच्या कामकाजाची माहिती घेतली. .Maharashtra Drought: दुष्काळ इष्टापत्ती ठरो!.शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक पाहणीतील अडचणी जाणून घेतल्या. या वेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते..Drought Chana Variety: दुष्काळाच्या परिस्थितीत विभागानुसार हरभऱ्याचे कोणते वाण वापरावे?.अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले, की पीक पाहणीतील अचूक नोंदीमुळे पिकांची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यात कृषी नियोजन, शासकीय योजना आणि आवश्यक मदतीसाठी या नोंदी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पीक पाहणीचे काम पारदर्शक, अचूक आणि विहित कालावधीत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. या वेळी शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदणीतील अडचणी व अपेक्षा मांडल्या..अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणीचे महत्त्व, नोंदणीची प्रक्रिया तसेच त्यातून उपलब्ध होणाऱ्या शासकीय सुविधांबाबत माहिती दिली. तसेच, पीक पाहणी नोंदणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.