Buldhana News: शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता, वेग आणि सुलभता आणण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘डिजिटल क्रांती’कडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ‘महसूल मित्र - सुलभ चॅटबॉट सेवा’ हा व्हॉट्सअॅप आधारित नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्म नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. नागरिकांना आता ९४२३१८४८०४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून घरबसल्या महसूल विभागाशी संपर्क साधता येणार आहे..हा चॅटबॉट मराठी व इंग्रजी भाषांमध्ये दिवसरात्र अखंडित उपलब्ध असून विविध महसूल सेवांची माहिती एका क्लिकवर मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या सोईसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म अँड्रॉइड, आयओएस आणि संगणकावर पूर्णपणे वापरण्यास सक्षम आहे..Revenue Services: पुणे जिल्ह्यात सेवादूत घरपोच पोहोचविणार दाखले.यामुळे नागरिकांचा प्रवासाचा खर्च व वेळ वाचणार असून घरबसल्या सेवा मिळतील. जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी ‘महसूल मित्र - सुलभ चॅटबॉट’ सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे..MSEDCL Digital Services: नाव बदलाच्या ऑनलाइन सुविधेचा ५८ हजार ग्राहकांना लाभ .सेवेचे फायदे सेवा हक्क कायद्यांतर्गत सेवाजिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयांतील सेतू सेवांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती, सहज प्रणालीजुने महसूल अभिलेख व दस्तऐवज तत्काळ पाहण्याची सुविधा.नागरिकांच्या महसूलविषयक ऑनलाइन तक्रारींची निवारण यंत्रणावारंवार विचारल्या जाणाऱ्या शेतीविषयक कायदे, नियम, जमिनीचे रेकॉर्ड आदींबाबत एआयद्वारे उत्तरे..जवळचे आधार केंद्र सहज शोधण्याची सोयजिल्ह्यातील महत्त्वाचे विषय व सांख्यिकीय माहिती ग्राफिक्स स्वरूपात पाहण्याची सोयमहसूल विभागाच्या शासन निर्णयांचा (जीआर) त्वरित शोधण्याची सोय.आधार क्रमांकाच्या आधारे संजय गांधी निराधार योजना अनुदानाची स्थिती पाहण्याची सुविधा.जिल्हाधिकारी, उपविभागीय व तहसील कार्यालयांतील विविध शाखेतील सेवेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.