Kolhapur News : कागल तालुक्यातील वेदगंगा व चिकोत्रा नदीवरील दुरवस्था झालेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधारे दुरुस्तीसाठी ३ कोटी ८३ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. .वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीसाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती दत्ता पाटील-केनवडेकर यांनी दिली. वेदगंगा नदीवरील चिखली, बस्तवडे, कुरणी तर चिकोत्रावरील बेळुंकी, चांभारखडक (अर्जुनवाडा), नंद्याळ, वडगाव येथील बंधारे पुराच्या पाण्यामुळे नादुरुस्त झाले आहेत. .Kolhapuri Bandhara : सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोल्हापुरी बंधारे उभारा .याचा परिणाम पाणी साठ्यावर होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीच्या तर गावकऱ्यांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. चिकोत्रा धरणातून १५ ते २० दिवसांनी आवर्तन सोडले जाते. त्यामुळे नदीवरील बंधाऱ्यात पाणीसाठा गरजेचे आहे. .Kolhapuri Barrage : शिवगंगा नदीवरील बंधारा जर्जर अवस्थेत .प्रशासनाने पाणीसाठ्याचा विचार करून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. बंधाऱ्याचे नाव व कंसात निधी लाखांमध्ये कुरणी (६६ लाख ७४ हजार), चिखली (५२ लाख), बस्तवडे (७४ लाख), बेळुंकी (२४ लाख ४० हजार), चांभारखडक- अर्जुनवाडा ( ४७ लाख ३७ हजार), नंद्याळ (६७ लाख ७८ हजार), वडगाव (५१ लाख ५२ हजार), यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांचे सहकार्य लाभल्याचे दत्ता पाटील यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.