Solapur News: हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे फळपीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे फळपिके संरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या द्राक्ष, आंबा, पपई आणि मोसंबीसाठी ऑक्टोबरअखेर अर्जाची मुदत आहे. शेतकऱ्यांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे..हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे फळपिकांचे उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांवर नोंदवलेल्या माहितीच्या आधारे पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता इत्यादी घटकांचा अभ्यास करून विमा रक्कम निश्चित केली जाते..fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा.यामध्ये मृग बहारातील डाळिंब, पेरू, लिंबू, चिक्कू, सीताफळ, मोसंबी, आंबिया बहारातील डाळिंब, द्राक्ष, आंबा, पपई, केळी, मोसंबी आदी फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ऑक्टोबरअखेर मुदत असल्याने शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, परिसरातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे..Fruit Crop Insurance : डाळिंबासाठी विमा योजना.योजनेची वैशिष्ट्येअधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू.कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक.भाडेपट्टी व कुळाने शेती करणारे शेतकरीही पात्र.जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा नोंदणी.एकाच फळपिकासाठी एका हंगामात एकच अर्ज.उत्पादनक्षम वयाच्या बागांसाठीच विमा संरक्षण..पीकनिहाय, आंबिया बहारासाठीविमा हप्ता व संरक्षित रक्कमद्राक्ष आंबिया १५ ऑक्टोबर १९००० ३८००००आंबा आंबिया ३१ डिसेंबर ८५०० १७००००पपई आंबिया ३१ ऑक्टोबर २००० ४००००मोसंबी गारपीट ३१ ऑक्टोबर १६५० ३३०००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.