Urban Water Crisis: शहरात महापालिकेच्या वतीने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. पण, काही भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गेल्या महिन्यात येथील एका भागात काळे पाणी नळाला आले होते. तर, मंगळवारी (ता. ३१) शहरातील बोधेनगर भागात नळाला पिवळे पाणी आले. .सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यात असे काळे, पिवळे पाणी येत असल्याने नागरिकही त्रस्त आहेत. असे पाणी प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महापालिका शहराला आठवड्यातून एकदा नळाला पाणीपुरवठा करीत आहे. त्यातही कधी तांत्रिक बिघाड झाला की पाण्याचे वेळापत्रक कोलमडले जात आहे. .Water Scarcity: काही शिवारांत पाणीटंचाईची स्थिती.काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाने ३२ कोटींच्या थकीत बिलासाठी शहराचा पाणीपुरवठा खंडित केला होता. काही पैसे भरल्यानंतर हा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. याचा फटकाही नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यात काळे, पिवळे पाणीही नळाला येत आहे..दोन महिन्यांपासून दूषित पाणीशहरातील जुना औसा रस्त्यावरील कालिकादेवी मंदिराचा पाठीमागचा भाग, राधाकृष्णनगर, सद्गुरूनगर, दादोजी कोंडदेवनगर हे महत्त्वाचे भाग आहेत. या भागात लोकसंख्याही मोठी आहे. प्रत्येकाच्या घरात महापालिकेची नळ जोडणी आहे. फेब्रुवारी व मार्चच्या सुरवातीला नळाला पाणी आल्यानंतर पहिली वीस मिनिटे काळे दूषित पाणी येत होते. पाण्याची दुर्गंधी येत होती. त्यामुळे हे पाणी भरून न ठेवता सरळ नाल्यामध्ये सोडून देण्याची वेळ नागरिकांवर आली होती..Water Scarcity: पाणी टंचाईसाठी जनजागृती व्हावी : काटकर.बोधेनगरात पिण्याचे पाणी की सांडपाणीआता मंगळवारी येथील बोधेनगर भागात महापालिकेच्या वतीने नळाला पाणी सोडण्यात आले. या भागातील नळाला पिवळे पाणी आले आहे. त्यामुळे असे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. अगोदरच आठवड्यातून एकदा नळाला पाणी येते. त्यात असे पिवळे पाणी आल्याने नागरिक त्रस्त झाले. आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांवर असे पाणी केवळ सांडपाणी म्हणून वापर करण्याची वेळ आली आहे. पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.