Latur / Dharashiv News : : दरवर्षी लहानमोठ्या प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा होण्यासाठी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परतीच्या पावसाची वाट पहावी लागत होती. यंदा ऑगस्टमध्येच काही प्रकल्प सोडले तर बहुतांश प्रकल्पात शंभर टक्क्याच्या जवळपास पाणीसाठा झाला आहे. .गेल्या आठवड्यापासून दोन्ही जिल्ह्यांत होत असलेल्या जोरदार पावसाने ही किमया केली असून पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले तरी प्रकल्पात मुबलक पाणी आल्यामुळे रब्बीच्या हंगाम खात्रीशीर केला आहे. यंदा ऑगस्टमध्येच प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा आल्याने प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावांची पाणीटंचाईची भीती दूर झाली आहे..दोन्ही जिल्ह्यात तीन मोठे, २५ मध्यम, ३४२ लघु असे ३७० प्रकल्प असून यातील तीन मोठ्यापैकी मांजरा, निम्नतेरणा व सीना कोळेगाव धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस पडत असल्याने प्रकल्पांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नद्यांनाही मुबलक पाणी आले असून नद्यांवर काही वर्षात उभारलेल्या उच्चस्तरीय बंधाऱ्यांतही (बॅरेजेस) चांगले पाणी आले आहे. .Marathwada Water Storage : ‘जायकवाडी’चा उपयुक्त पाणीसाठा ९८.३० टक्क्यांवर .पंचेवीसपैकी लातूर जिल्ह्यातील मसलगा प्रकल्पाचा अपवाद सोडला तर तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ व घरणी प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आला आहे. दोन दिवसाच्या पावसाने साठ्यात भर पडली असून दुरुस्तीमुळे केवळ मसलगा प्रकल्पात २.३४ दलघमी (१७.२०) टक्के पाणी अडवले असून प्रकल्पाच्या पाळुला भेगा पडल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील १३ पैकी रायगव्हाण (ता. कळंब) प्रकल्पात आता कुठे पाणी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. दरवर्षी हा प्रकल्प उशिरा भरतो..मागील दोन वर्षात प्रकल्पात क्षमतेएवढे पाणी आले नाही. यंदाही सर्व प्रकल्प तुडूंब भरले असताना रायगव्हाणध्ये केवळ अर्धा दलघमी (४.८७ टक्के) पाणी आले आहे. वाघोली प्रकल्पात ४४.६३ तर खंडेश्वरमध्ये ४१.४६ टक्के पाणीसाठा सोडला तर उर्वरित तेरणा, रुई, बाणगंगा, रामगंगा, संगमेश्वर, चांदणी, साकत, कुरनूर, हरणी, खंडाळा, जकापूर, तुरोरी व बेनीतुरा प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. .Khandesh Water Storage : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांत जलसंचय वाढला.बहुतांश प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असून काही प्रकल्पाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. ३४२ लघु प्रकल्पात सध्या ८१.४५ टक्के पाणीसाठा झाला असून एकूण ३२७ दलघमी साठवण क्षमतेच्या प्रकल्पात २६६ दलघमी पाणी दाखल झाले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत प्रकल्पाच्या पाणीसाठात १६ दलघमीने वाढ झाली..पाच वर्षात पहिल्यांदाच मुबलक पाणीमागील पाच वर्षात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकल्पामध्ये एवढा मोठा पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रकल्पाची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता एक हजार २९२ दलघमी असून सध्या एक हजार ६६ दलघमी पाणीसाठा (८२.५१ टक्के) झाला आहे. .सन २०२१ ते २०२४ दरम्यानच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये ऑगस्टमध्ये ८९४ दलघमी पाणीसाठा झाला होता. त्यानंतर २०२३ मध्ये २३७ दलघमी तर गेल्यावर्षी २०२४ मध्ये ४८९ दलघमी पाणीसाठा झाला होता. यामुळे पाच वर्षात सर्व प्रकल्पांतील पहिल्यांदाच पाणीसाठा पन्नास टक्क्याच्यावर गेला आहे. एकाच आठवड्यातील पावसाने उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता दूर केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.