Zilla Parishad Elections: जालना ‘झेडपी’ सदस्यांचे आरक्षण निश्चित
Maharashtra Politics: जालना जिल्हा परिषदेच्या गटनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नागरिकांचा मागास प्रवर्ग १५, सर्वसाधारण ३३, अनुसूचित जाती ८ आणि अनुसूचित जमाती १ असे गटनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले असून, पंचायत समित्यांच्या सभापती पदांची सोडतही यावेळी घेण्यात आली.