New York News: ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर थांबविण्याची विनंती पाकिस्तानच्या सैन्यानेच केली होती. भारत आणि पाकिस्तानमधील यांच्यातील या प्रश्नामध्ये तिसऱ्या कोणाचाही समावेश नव्हता,’ अशी ठाम भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडली. ‘‘भारत-पाक संघर्ष माझ्यामुळे थांबला,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार म्हणत असून, त्या पार्श्वभूमीवर भारताचे हे विधान अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. .भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी कार्यालयाच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतातर्फे उत्तर देण्यात आले. त्या वेळी गेहलोत बोलत होत्या. ‘‘या सभागृहाने पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून हास्यास्पद विधाने ऐकली असून, त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचे गुणगान केले आहे. दहशतवाद हाच पाकच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असून, कितीही खोटे बोलले तरी सत्य लपवता येत नाही,’’ असे त्या म्हणाल्या..Operation Sindoor : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त: परराष्ट्र मंत्रालय .गेहलोत म्हणाल्या, ‘‘२२ एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक ठार झाल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. ९ मेपर्यंत पाकिस्तान भारतावर आणखी हल्ल्यांच्या धमक्या देत होता; पण १० मे रोजी त्यांच्या सैन्याने आमच्याकडे लढाई थांबविण्याची विनंती केली. भारतीय लष्कराने अनेक पाक हवाई तळांचे नुकसान केले.’’.‘उद्ध्वस्त धावपट्या विजयासारख्या?’संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणावर भारताने तीव्र शब्दांत टीका केली. भारत-पाक संघर्षात आपला देश विजयी झाल्याचा दावा शरीफ यांनी केला होता. पाकिस्तानी सैन्याने भारताचे हल्ले परतवून लावले आणि सात भारतीय लढाऊ विमाने उद्ध्वस्त केल्याचा हास्यास्पद दावा त्यांनी केला होता. त्यावर ‘‘जर उद्ध्वस्त धावपट्ट्या आणि जळालेले अवशेष विजयासारखे दिसत असतील, तर पाकिस्तानने ते आनंदाने उपभोगावे,’’ असा टोला गेहलोत यांनी लगावला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.