Nanded News: जवळा मुरार ते देगाव (कारखाना) जोडणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीसाठी थेट राष्ट्रीयीकृत बँकेकडे कर्जाची मागणी करत लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात एल्गार पुकारला आहे. आता तरी रस्त्याची दुरुस्ती होणार का, असा सवाल या मार्गावरील अनेक गावांतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे..बारड मार्गे जवळा मुरार ते देगाव (कारखाना) हा दहा किलोमीटरचा रस्ता आहे. दरवर्षी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही तो कागदोपत्री खर्च दाखवून हडप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून, अंतर्गत रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. .Rural Road Damage : खरडलेल्या रस्त्यांना मुहूर्तच सापडेना.त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, रुग्ण व वृद्धांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाही लोकप्रतिनिधी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे..Rural Road Issue : पाणंद रस्त्यांच्या कामांना ‘ब्रेक’.गणेश लखे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया, बारड शाखेकडे रस्ता दुरुस्तीसाठी कर्ज देण्याची मागणी केली. सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे ..तसेच गावकरी कर्जफेड करण्यास सक्षम असून, सर्व नियमांचे पालन करू, असे निवेदनात नमूद केले. मात्र, अशा प्रकारचे कर्ज देण्याचा अधिकार नसल्याने निवेदन स्वीकारण्यात आले नसल्याची माहिती शाखा व्यवस्थापक संदीप वट्टमवार यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.