Pune News: टिश्यू कल्चर रोप व्यवसायाशी संबंधित शेतकरी व उद्योजकांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकताच दिला आहे. वीज दरातील चुकीच्या वर्गवारीमुळे वाढीव आकारलेली रक्कम ‘महावितरण’ने व्याजासह टिश्यू कल्चर उद्योजकांना परत करावी, असे स्पष्ट आदेश मंचाने दिले आहेत. .महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) पंचवार्षिक वीज आराखड्यात टिश्यू कल्चर उद्योगासाठी वीज वर्गवारी बदलण्याचे आदेश २८ मार्च रोजी दिले होते. त्यानुसार लघुदाब टिश्यू कल्चर ग्राहकांना एलटीआयव्ही- सी (LTIV-C)ऐवजी एलटीआयव्ही - बी (LTIV-B) (कृषिपंप) आणि उच्चदाब ग्राहकांना एचटीव्ही- बी (HTV-B) ऐवजी एचटीव्ही- ए (HTV-A )(कृषिपंप) ही वर्गवारी लागू करण्याचा निर्णय होता..Electricity Consumer Protest: वीज दरवाढीला ग्राहकांचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा.यामुळे उद्योगाला वीजदरात दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र आयोगाच्या आदेशानंतरही ‘महावितरण’ने सात महिने वर्गवारी बदल न केल्याने टिश्यू कल्चर कंपन्यांना वाढीव दराने वीजबिले आकारली जात होती. या बाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याने राज्यातील काही कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या..कोल्हापूर येथील सीमा बायोटेक व रुद्धी बायोटेक तसेच कराड येथील मारवल बायो प्लांट या तीन कंपन्यांच्या बाजूने निकाल देत मंचाने प्रत्येकी ४ ते ६ लाख रुपयांची रक्कम ५.७५ टक्के व्याजासह पुढील वीजबिलात समायोजित करण्याचे आदेश ‘महावितरण’ला दिले. सुनावणी दरम्यान मंचाने वीज नियामक आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्याबद्दल ‘महावितरण’च्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली..Mahavitaran Recruitment : वीज कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा.अखेर ‘महावितरण’कडून वर्गवारी बदलण्यास आणि वाढीव रक्कम व्याजासह परत देण्यास तयारी दर्शविण्यात आली. दरम्यान, अजित सीड्स, नमो बायो प्लांट, राम बायोटेक यांसह अन्य टिश्यू कल्चर कंपन्यांच्या तक्रारीही मंचाने दाखल करून केल्या आहेत. या निर्णयामुळे टिश्यू कल्चर उद्योगाला दिलासा मिळाला आहे..ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधामहावितरणने आयोगाच्या आदेशाप्रमाणे वर्गवारी बदलली नाही, तर कंपन्यांना घरबसल्या ग्राहक मंचाकडे https://mcp.mahadiscom.in/CGRF/cgrfuiActionName=getCreateGrievance या लिंकद्वारे ऑनलाइन तक्रारीची सोय उपलब्ध करून दिलेली आहे..टिश्यू कल्चर कंपन्यांना वीजपुरवठा अखंड देणे बंधनकारक आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यानंतर आयोगाने याचा सखोल अभ्यास करून वर्गवारी बदलण्याचे आदेश दिले आहेत. टिश्यू कल्चर, मशरूम कल्चर या व्यवसायांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.- अक्षय पाटील, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ प्लांट टिश्यू कल्चर इंडस्ट्रीज.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.