Dharashiv News : अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान भरून येणार नाही. या नुकसानीची पीकविमा भरपाई मिळणार आहे. यात जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी तीस टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा हफ्ता भरलेला नाही. या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसलेला आहे. .त्यामुळे पीकविमा न भरलेला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनाही भरपाई मिळावी, यासाठी बुधवारी (ता. १५) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मांडला. त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली असून हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती ''मित्र''चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली..जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ७३३ गावांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात धाराशिव तालुक्यातील सर्वाधिक १२५ गावांचे त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील १२२, भूम, परांडा आणि उमरगा तालुक्यातील ९६, लोहारा तालुक्यातील ४७, कळंब तालुक्यात ९७ तर वाशी तालुक्यातील बाधित गावांची संख्या ५४ इतकी आहे. .Ativrushti Madat GR: ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील नुकसानीसाठी २ हेक्टरच्या मर्यादेत मिळणार मदत.जिल्ह्यातील एकूण सहा लाख ३९ हजार ९२७ शेतकरी बांधवांच्या वाट्याला या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान आले आहे. जिल्ह्यात पाच लाख ३४ हजार ३८२ हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यात पाच लाख ५४३२ हेक्टर जिराईत, २२ हजार ६११ हेक्टर बागायत तर सहा हजार ६३९ हेक्टर क्षेत्र फळपिकांचे आहे. .बाधित असलेल्या संपूर्ण क्षेत्राचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण नुकसानीची तीव्रता अभूतपूर्व अशीच आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ६८३ विहिरी खचल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.पशुधन दगावले आहे, घरांची पडझड झाली आहे. शेतातील ड्रीपसेट, पंपसेटही पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले आहेत. पिकांचा चिखल झाला आहे. घरात साठवलेल्या धान्याचीही नासाडी झाली आहे. .Ativrushti Madat GR : सप्टेंबरमधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १ हजार ३५६ कोटी रुपयांचे होणार वितरण; शासन निर्णय जारी.मिळणारे अनुदान, विविध प्रकारची मदत आणि पीकविमा या सर्व बाबींचा मेळ घातला तरीही अनेकांचे नुकसान भरून निघणार नाही. त्यासाठी काही विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. जेणेकरून बाधित शेतकरी बांधवांना अधिकाधिक दिलासा मिळू शकेल. जिल्ह्यातील बाधित सहा लाख ३९ हजार ९२७ शेतकऱ्यांपैकी ३० टक्के शेतकरी बांधवांनी यंदा पीकविमाच भरला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे..ज्यांनी पीकविमा भरला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा, यासाठी सरकार संवेदनशीलपणे विचार करीत आहे. पुढील टप्प्यात पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासाठी बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसा ठराव मांडला. त्याला मान्यता देण्यात आली आहे. हा ठराव आपण राज्य सरकारकडे पाठवणार आहोत..अतिवृष्टी व पुरपरिस्थितीत चांगले कामजिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीत जिल्हा प्रशासन व यंत्रणांनी मेहनत करून चांगले काम केले आहे. त्यामुळे शेवटच्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचता आल्याचे कौतुकास्पद उदगार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काढले. पुरामुळे अनेक ठिकाणी असलेल्या डीपी वाहून गेल्या. मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे, त्यामुळे वीज वितरण कंपनीने खंडित फिरत रोड करण्याचे काम हाती घ्यावे. जिल्ह्यात आवश्यक असलेल्या डीपी मागणीचा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना सरनाईक यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.