Drought Management : मंगळवेढा भीमा नदीवरील तालुक्यातील बंधाऱ्यांची दारे दरवर्षी १५ ऑक्टोबरनंतर बसविली जातात. मात्र, यंदाची तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता १५ ऑक्टोबरची वाट न पाहता बंधाऱ्यांची दारे तातडीने बसवावीत, अशी आग्रही मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून होत आहे..चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीपात्रातील पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. दुसरीकडे, उजनी व वीर लाभक्षेत्रात अतिरिक्त झालेले पाणी नदीपात्रातून सोडण्यात आल्याने जवळपास ५९ टीएमसी पाणी वाहून गेले. .Bhima River Flood Situation : भीमा नदीला पूरस्थिती कायम.तालुक्यातील उचेठाण, बठाण, माचणूर, सिद्धापूर व अरळी या बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेती आहे. तसेच पंढरपूर व मोहोळ तालुक्यांतील अनेक गावांची शेती आणि पाणीपुरवठा योजनाही या बंधाऱ्यांवर अवलंबून आहेत..Chandrabhaga River: चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली.सध्या शेतांमध्ये ऊस आणि अन्य पिके उभी असून, ती अंतिम टप्प्यात आहेत. या पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी आताच अडविले नाही, तर हाता-तोंडाशी आलेला ऊस आणि अन्य पिके डोळ्यांदेखत जळून खाक होतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत..सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा विचार करून साडेचार मीटर उंचीच्या बंधाऱ्याची दारे सध्या अडीच मीटरपर्यंत बसविण्यात आली आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यात आणखी वाढ करण्यात येईल.- नागेश जडे, शाखा अभियंता, उजनी पाटबंधारे विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.