Nagpur News: विदर्भात नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या आप्तेष्टांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचाही समावेश आहे. त्यासोबतच उमरखेड (यवतमाळ) मध्ये भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांच्या पत्नी निधी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला..वर्धा जिल्ह्याचा विचार करता देवळी मध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. खासदार अमर काळे यांनी काँग्रेससोबत आघाडी केली होती. सर्व महत्त्वाच्या जागा खासदार काळे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याने मोठा असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान माजी खासदार तडस यांचे पुत्र पंकज यांनी वाजवीपेक्षा निवडणूकीत अधिक हस्तक्षेप केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला..Local Body Result: फुलंब्रीत भाजपला मोठा धक्का.याचा फटका दोन्ही आजी-माजी खासदारांना बसला. देवळी नगरपालिकेत शोभा तडस यांचा धक्कादायक पराभव झाला तर अपक्ष उमेदवार ठाकरे विजयी झाले. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनादेखील धक्का सहन करावा लागला. त्यांचा गड असलेल्या सावनेरसह चार नगरपालिकांपैकी तीन नगरपालिकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. केदार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारत नगराध्यक्ष पदासाठी निवडलेले सर्वच उमेदवार पराभूत झाले..Bihar Election Result: दो हजार पच्चीस...फिर से नितीश!.सावनेर, कळमेश्वर, खापा आणि मोहपा या चार नगरपरिषदांपैकी काँग्रेसला फक्त मोहपा येथे विजय मिळाला. येथून काँग्रेसचे माधव चर्जन निवडून आले. रामटेक लोकसभा मतदारसंघात धक्कादायक विजयाची नोंद करणारे काँग्रेसचे खासदार श्याम कुमार बर्वे यांना आपल्या गावातील नगरपंचायत मात्र राखता आली नाही..त्यांचे मूळ गाव असलेल्या कन्हान कादरी नगरपंचायत मध्ये काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. येथून भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार सुजित पानतावणे मोठ्या फरकाने विजयी झाले. काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला नगराध्यक्ष पद देण्यात आल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. राज्याचे माजी गृहमंत्री तसेच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य झाले देशमुख यांनी विरोध दर्शवला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा सुद्धा दिला होता..असे असतानाही शेतकरी कामगार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अर्चना राहुल देशमुख या निर्णायक आघाडी घेत विजयी झाल्या. राज्याचे लक्ष लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपालिकेवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. उमरखेड मतदार संघात भाजपला धक्कादायक पराभव सहन करावा लागला. या ठिकाणी भाजपचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या पत्नी निधी भुतडा नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार होत्या.परंतु महाविकास आघाडी समर्थित अपक्ष उमेदवार तेजश्री जैन यांनी त्यांना पराभवाची चव चाखायला लावली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.