Amravati News: धडक सिंचन विहीर योजना बंद केल्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेवर संक्रात येण्याचे संकेत आहेत. या दोन्ही योजनांच्या अनुदानात गेल्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने कपात करण्यात आली आहे..सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी वर्ष २०१९ मध्ये धडक सिंचन विहीर योजना लागू केली. या योजनेस प्रतिसाद मिळत नसल्यावरून निधीत कपात व नंतर ती योजनाच गुंडाळण्यात आली. याच धर्तीवर अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व आदिवासी शेतकऱ्यांकरिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणल्या गेली..Well Subsidy : तिवसा तालुक्यातील ५८४ विहिरींचे अनुदान रखडले.गेल्या तीन वर्षांत या योजनेतील निधीत कपात करण्यात आली आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी जिल्ह्यास १२ कोटी रुपये अनुदान मंजूर होते. त्यामध्ये कपात केली असून, वर्ष २०२५-२६ साठी ७.७० कोटी मंजूर करण्यात आले आहेत, तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निधीतही दोन कोटींनी कपात करण्यात आली आहे..दोन्ही योजनेअंतर्गत अनुदान रकमेतून निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना अनुदान देणे अशक्य होत असल्याने जिल्ह्याचे लक्ष्यांक कमी होऊ लागले आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये १४६४ जणांची निवड करण्यात आली व प्रत्यक्षात लाभ ८९९ ला मिळाला तर वर्ष २०२४-२५ मध्ये ही संख्या ३०८ पर्यंत खाली आली. असाच प्रकार बिरसा मुंडा योजनेत आहे. आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये १२७ व दुसऱ्या वर्षी ३७ लाभार्थ्यांनाच मिळू शकला आहे..Irrigation Scheme : बेलकुंड उपसा जलसिंचनसाठी १९० कोटींचा निधी मंजूर .डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनावर्ष प्राप्त निधी (कोटी रुपये) निवड प्रत्यक्ष लाभ२०२३-२४ १२ १४६४ ८८९२०२४-२५ ८ ः ४५६ ३०८२०२५-२६ ६.२२ २४० वितरण नाही.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रातील)वर्ष प्राप्त निधी (कोटी रुपये) निवड प्रत्यक्ष लाभ२०२३-२४ ४ ३०४ २९२२०२४-२५ २.४० ६२ ४९२०२५-२६ २.४० १७५ वितरण नाही.क्षेत्राबाहेरवर्ष प्राप्त निधी (लाख रुपये) निवड प्रत्यक्ष लाभ२०२३-२४ ६५ २०९ १२७२०२४-२५ ६० ४८ ३७२०२५-२६ ५२.७२ २५ वितरण नाही.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.