Wheat Production India 2026: यंदा गहू पीक क्षेत्र वाढले आहे. तसेच पोषक हवामानामुळे पिकाची वाढ चांगली आहे. यामुळे यंदा देशातील गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या विक्रमी १,१७९ टनांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी बुधवारी सांगितले.."सध्या, गव्हाचे पीक चांगल्या स्थितीत उभे आहे. त्याचे कोणतेही नुकसान झालेले नाही. एकूणच, यंदा उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेच चांगले असेल," असा अंदाज चौहान यांनी व्यक्त केला आहे. ते भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना बोलत होते..आयसीएआरचे महासंचालक एम एल जाट यांनी म्हटले आहे की, गहू पिकाने ३२० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र व्यापले आहे आणि एकूणच पीक परिस्थिती अजूनही चांगली दिसून आली आहे. "पिकाची वाढ चांगली झाली आहे. जर हवामान आहे तसे अनुकूल राहिल्यास उत्पादन १,२०० टनांपर्यंत पोहोचू शकते," असे जाट म्हणाले. वेळेवर आणि लवकर पेरणी झाल्यामुळे भरघोस उत्पादन मिळण्याची शक्यता आहे..Rabi Crop Growth: रब्बी पीक क्षेत्रात जवळपास ३ टक्के वाढ, गव्हाचे पीक जोमात, विक्रमी उत्पादन शक्य.कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ मधील चालू रब्बी हंगामात २ जानेवारीपर्यंत ३३४.१७ लाख हेक्टरवर गहू पीक क्षेत्र होते. गेल्या वर्षी पीक क्षत्र ३२८ लाख हेक्टरवर होते..Rabi Sowing: रब्बी पीक पेरा ९२ टक्क्यांवर.देशातील ७३ टक्क्यांहून अधिक पेरणी केलेल्या क्षेत्रावर हवामान सहनशील आणि बायो-फोर्टिफाइड बियाणे वाणांची लागवड करण्यात आली आहे, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. त्याची पेरणी पूर्ण झाली आहे. त्याची मार्चमध्ये कापणी सुरू होईल. भारत हा चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.