Buldana News: बुलडाणा जिल्ह्यात या वर्षी रब्बी हंगामात मक्याच्या लागवडीने नवा उच्चांक गाठला असून, तब्बल ३९,१३१ हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मका लागवड होण्याची ही गेल्या काही वर्षात पहिलीच वेळ मानली जात आहे. यापूर्वी बुलडाणा जिल्ह्याचे रब्बीतील मक्याचे सरासरी क्षेत्र केवळ १७,४४९ हेक्टर इतके होते. मात्र यंदा या सरासरीच्या तुलनेत तब्बल २२४ टक्क्यांनी वाढ झाल्याने कृषी विभागासह शेतकरी वर्गातही या बदलाची मोठी चर्चा होत आहे..या वाढीमागे अनेक आर्थिक आणि शेतीविषयक कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील काही वर्षांपासून रब्बी हंगामातील पारंपरिक पिके असलेल्या गहू आणि हरभरा यांचे उत्पादन तुलनेने स्थिर राहिले आहे. त्याच वेळी बियाणे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि इंधन यांसारख्या शेती खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र या पिकांना बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला आहे..Maize Cultivation : मका मळणीवर; काही भागांत कापणी सुरू.या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून मक्याकडे मोर्चा वळवला आहे. मका पिकाला तुलनेने कमी कालावधी लागतो. उत्पादन खर्च नियंत्रित राहतो आणि पशुखाद्य, कुक्कुटपालन उद्योग तसेच औद्योगिक वापरामुळे याला मागणी असते. .Maize Cultivation: मराठवाड्यात मक्याची विक्रमी ३ लाख ४८ हजार हेक्टरवर लागवड.काही भागांत मक्याला समाधानकारक दर मिळाल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. परिणामी यंदा मोठ्या प्रमाणावर मका लागवड केली आहे..विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंदा बुलडाणा जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यामुळे बुलडाणा जिल्हा रब्बी मक्याच्या लागवडीत आघाडीवर आला असून आगामी काळात मक्याच्या उत्पादनातही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वाढ शेतकऱ्यांच्या बदलत्या पीक पद्धतीचे द्योतक असून, बाजारभाव, खर्च आणि नफ्याचा विचार करून शेतकरी निर्णय घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.