Pune News: देशात यंदा कापसाची विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क काढून टाकले आहे. तसेच देशातील कापूस उत्पादनात यंदा घट होऊन ते १७ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कापूस आयातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.८ टक्के वाढ होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) वर्तविला आहे. .सीएआयने मंगळवारी (ता.११) प्रसिद्ध केलेल्या अहवालात यंदा देशात ३०५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज दिला आहे. गेल्या वर्षी ३१२ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. यंदाचे उत्पादन २००८-०९ नंतरचे सर्वांत कमी ठरेल..Cotton Market: हिंगणघाट बाजार समितीत ५२३ ट्रक कापसांची आवक.देशातील कापसाचा वापरही यंदा गेल्या वर्षीपेक्षा ४.५ टक्क्यांनी कमी राहून ३०० लाख गाठींवरच स्थिरावेल, असे सीएआयने म्हटले आहे. भारतातून २९ टक्के कापड निर्यात अमेरिकेला होत असते. पण अमेरिकेने भारतावर तब्बल ५० टक्के आयात शुल्क लावल्याने निर्यात थंडावली. त्यामुळे देशात कापसाचा वापर कमी होईल, असा सीएआयचा अंदाज आहे..Cotton Production: मराठवाड्यात एक दोन वेचणीतच कपाशीचा धुराळा.दरम्यान, सीएआयने यंदा ३०५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला असला, तरी उद्योगांतील जाणकारांच्या मते उत्पादन यापेक्षाही कमी होईल. यंदा महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे देशातील कापूस उत्पादन २८० ते २८५ लाख गाठी राहील, असा अंदाज काही जाणकारांनी व्यक्त केला. तसेच सीसीआयने कापसाचा शिल्लक साठा ६० लाख गाठी राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला असताना काही व्यापाऱ्यांच्या मते शिल्लक साठा ४५ लाख गाठी राहील..राज्यनिहाय उत्पादनाचा अंदाज (लाख गाठींमध्ये)राज्य उत्पादनाचा अंदाज बदल (गाठींमध्ये)महाराष्ट्र ८८ (- ३)गुजरात ७२ (- ५)तेलंगणा ४३ (- ५.७५)उत्तर भारत ३०.५५ (+ १)कर्नाटक २५ (+ १)मध्य प्रदेश १९ (०)आंध्र प्रदेश १७ (+ ३.७५)(स्रोत ः सीएआय).आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त आहे. केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत काढले आहे. त्यामुळे डिसेंबर संपण्यापूर्वी कापूस आयात करण्यासाठी कापड उद्योग घाई करत आहे. यंदा विक्रमी ४५ लाख गाठी कापूस आयात होण्याची चिन्हे आहेत. त्यापैकी जवळपास ३० लाख गाठी कापूस डिसेंबरपर्यंत येईल.अतुल गणात्रा, अध्यक्ष, काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.