Nanded News : यंदा ऑगष्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे साडेतीन महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९१६.३० मिलिमीटरनुसार १०२.८० टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले आहे..पावसाचे प्रमाण लक्षात घेता पावसाळ्याच्या आगामी दीड महिन्यात किती पाऊस पडतो यावर रब्बीचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्ह्यात एक जून ते ३१ ऑक्टोबर या पावसाळ्याच्या पाच महिन्यात सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो. हे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे. यात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात १०२६.५८ मिलिमीटर तर माहूर तालुक्यात १०१६.७० मिलिमीटर पाऊस पडतो..Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस मंडलांत अतिवृष्टी.तर भोकर तालुक्यात ९६३.२८, बिलोली तालुक्यात ९१०.८७ मिलिमीटर पाऊस पडतो. जिल्ह्यात यंदा सर्वाधीक पाऊस मुदखेड तालुक्यात झाला आहे. मुदखेडची वार्षिक सरासरी ८२९.२० मिलिमीटर असताना आजपर्यंत १००२.१० मिलीमीटरनुसार १२०.८५ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस देगलूर तालुक्यात नोंदला आहे. या तालुक्याची वार्षिक सरासरी ८२०.७५ मिलिमीटर असताना आजपर्यंत या तालुक्यात ७५७.८० मिलीमीटरनुसार ९२.३३ टक्के पाऊस झाला आहे..दरम्यान या वर्षी जून महिन्यात पावसाने दमदार सुरू केल्यानंतर जुलैमध्ये काही दिवस पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावून पावसाळ्याच्या साडेतीन महिन्यातच वार्षिक सरासरी ओलांडली. .Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका.आगामी दीड महिन्याच्या काळातही पावसाची शक्यता असल्यामुळे यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व लहान-मोठे प्रकल्प तुडुंब भरले असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात पूर येऊन नदीकाठच्या भागातील पिके खरडून गेली..तसेच सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात या वर्षी नुकसान झाले आहे. सध्या प्रशासनाने जिल्ह्यातील जिरायती, बागायती फळपिकांचे सहा लाख ४८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना भरपाईसाठी ५७४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान यंदा भरघोस पावसामुळे आगामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.