Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली. काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकवत अन्य पक्षांतून अर्ज दाखल करण्यात आले, तर काही ठिकाणी अनपेक्षितपणे नवीन युती, आघाड्या तयार झाल्या. आता माघारीवरून खल होणार आहे..कार्यालयांच्या परिसरात इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, समर्थक आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्यालयात पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले..Local Body Elections: नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी हातकणंगले तालुका वगळता ५९३ उमेदवारांनी आणि पंचायत समित्यांसाठी ११०७ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारपर्यंत (ता. २७) अर्ज मागे घेता येणार आहेत..Local Body Election: शेवटच्या क्षणापर्यंत पक्षांतर, वाटाघाटी.काही उमेदवारांनी साधेपणाने अर्ज दाखल केले, तर अनेकांनी ढोल-ताशे, फटाके आणि वाहन रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. पक्षीय उमेदवारी जाहीर न झाल्याने अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी एका गटासाठी दोन-दोन, तीन-तीन इच्छुक मैदानात उतरल्याने पुढील टप्प्यात पक्षांतर्गत नाराजी व बंडखोरी उफाळली आहे. अर्ज छाननीनंतर व माघारीच्या कालावधीत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे..अर्ज दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शपथपत्रे, प्रस्तावक-समर्थकांची उपस्थिती यामुळे कार्यालयीन यंत्रणेवरही मोठा ताण आला. कर्मचारी दिवसभर अर्ज स्वीकारण्यात गुंतलेला दिसून आला. काही उमेदवार शेवटच्या क्षणी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी इकडून तिकडे धावत होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.