२०२५-२६ मध्ये जीडीपी वाढ ७.३ टक्के राहणार असल्याचा अंदाजही जीडीपी वाढ पूर्वीच्या ६.८ टक्के अंदाजाच्या तुलनेत अधिक खरिपातील भरघोस पीक उत्पादनामुळे जीडीपी वाढ शक्य असल्याचे आरबीआयचे म्हणणे.Indian economy: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी २०२५-२६ साठी देशांतर्गत उत्पादन वृद्धीदर (GDP) ७.३ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. ही जीडीपी वाढ पूर्वीच्या ६.८ टक्के अंदाजाच्या तुलनेत अधिक आहे. खरीप हंगामातून भरघोस पीक उत्पादनाचा अंदाज, देशातील धरणांत मुबलक पाणीसाठा, रब्बी पीक पेरणीसाठी पोषक हवामान, जीएसटी दर कपात आणि महागाईत घट झाल्याने ही जीडीपी वाढ शक्य असल्याचे आरबीआयने म्हटले आहे..पतधोरणविषयक समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत वृद्धीदर ८.२ टक्क्यांपर्यंत वाढला. तर महागाईचा दर १.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक दुर्मिळ अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे..RBI Monetary Policy: कर्जाचा हप्ता कमी होणार; आरबीआयकडून रेपो दरात कपात.“शेती क्षेत्रातून मजबूत संभाव्य वाढ, जीएसटी दरातील सुधारणेचा सातत्यपूर्ण परिणाम, कमी झालेली महागाई, उद्योगसमूह आणि वित्तीय कंपन्यांचा सुदृढ ताळेबंद, तसेच अनुकूल पतविषयक आणि आर्थिक परिस्थिती यांसारखे देशांतर्गत घटक अर्थव्यवस्थेच्या वाढीला सतत चालना देतील,” असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.."हे सर्व घटक विचारात घेतल्यास, २०२५-२६ साठी जीडीपी वाढ ७.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ ७ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.७ टक्के आणि दुसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. जोखीम समान प्रमाणात संतुलित आहेत," असे आरबीआय गव्हर्नर यांनी म्हटले आहे. .Foodgrain Production: भारतानं धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला, भात उत्पादन सर्वाधिक, विक्रमी वाढ.यंदा खरिपातून विक्रमी धान्य उत्पादनाचा अंदाजदरम्यान, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच, मुख्य खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला होता. यंदा खरिपातून विक्रमी उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एकूण धान्य उत्पादनात ३८.७ लाख टनांनी वाढ होऊन ते १ हजार ७३४ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. खरीपातून मुख्यतः भात आणि मक्याचे भरघोस उत्पादन अपेक्षित आहे. देशातील काही भागात अतिवृष्टीचा काही प्रमाणात खरीप पिकांवर परिणाम झाला. परंतु बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याने शेतीला मोठा फायदा झाला. यामुळे एकूणच पिकांची वाढ चांगली झाली असल्याचे कृषिमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे..शेती क्षेत्राचा जीडीपीत वाटा किती?देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी शेती आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्राचा जीडीपी वाटा सध्याच्या १८ टक्क्यांवरून किमान २६ टक्क्यांपर्यंत जाण्याची गरज असल्याचे याआधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.