Loan Waiver Demand: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित आणि कर्ज पुनर्गठनामुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा, या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (ता. २७) मुंबईत आंदोलन केले. मंत्र्यांचे बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्याचा इशारा तुपकरांनी दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले..तुपकरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते..Ravikant Tupkar Protest: सरसकट कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर आक्रमक, मुंबईत आंदोलनापूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांची धरपकड.दरम्यान, तुपकर नेमके कुठे आहेत, याचा पोलिसांना थांगपत्ता लागत नसतानाच त्यांनी पोलिस बंदोबस्ताला चकवा देत तुलनेने कमी बंदोबस्त असलेला मार्ग पकडला. कार्यकर्त्यांसह ते अचानक मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दिशेने पुढे आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडविले..Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम.या वेळी तुपकर आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलिसांनी तुपकरांना रोखून ताब्यात घेतले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. काही आंदोलकांना पोलिसांच्या वाहनांतून नेण्यात आले..तुपकरांनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना तुपकरांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या कारवाईचा निषेध केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.