Farmers Demand: सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतीमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (ता. ९) विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन केले..शेतकऱ्यांसह मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेल्या तुपकर यांनी विधान भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलकांनी सातबाराच्या प्रति विधान भवनाच्या दिशेने भिरकावल्या. तसेच सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि बाजरी टाकून सरकारचा निषेध नोंदविला..Farmer Protest: सरसकट कर्जमुक्तीसाठी विधानभवनासमोर कापूस, सोयाबीन, ज्वारी फेकत आंदोलन, रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात.‘सरसकट कर्जमुक्ती द्या,’ ‘सरकारने दिलेला शब्द पाळा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले. ‘‘सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफी योजनेतील जाचक अटी आणि निकष तातडीने रद्द करावेत. राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा सातबारा सरसकट कोरा झाला पाहिजे,’’ अशा मागण्या तुपकर यांनी आंदोलनादरम्यान केल्या..Farmer Protest: कर्जमाफीच्या निकषांविरोधात भोकरदनमध्ये विहिरीत खाट टाकून आंदोलन.याच मागण्यांसाठी तुपकर यांनी जून महिन्यात अन्नत्याग आंदोलन छेडले होते. त्या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र आश्वासनानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी गुरुवारी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली..मंत्री महाजन यांनी तुपकर यांना दूरध्वनी करून दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती दिली. परंतु रात्री उशिरापर्यंत बैठक झालेली नव्हती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.