Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरी विभागांतर्गत येणाऱ्या विविध तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांच्या नूतन बांधकामांसाठी शासनाकडून मोठा निधी वितरित करण्यात आला आहे. या कामांची जबाबदारी आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडली जाणार आहे. रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांमधील महसूल कार्यालयांच्या बांधकामाचा यामध्ये समावेश आहे. .शासकीय आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी या प्रकल्पांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांमधील महसूल कार्यालयांच्या बांधकामाचा समावेश आहे..Revenue Department : संगमनेरला महसूल मंडळाची फेररचना होणार.यापूर्वी या कामांसाठी केवळ १८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते, मात्र आता १ कोटी ५१ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने रखडलेली बांधकामे मार्गी लागणार आहेत..Revenue Department : महसूल मंत्र्यांच्या छाप्यानंतर उपनिबंधक कपले निलंबित .सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या या कामांमध्ये राजापूर तालुक्याला सर्वाधिक झुकते माप देण्यात आले आहे. राजापूर तालुक्यातील ६३ तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, रत्नागिरी तालुक्यातील ६५ तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी ५३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. .याशिवाय राजापूर आणि लांजा येथील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ५.६० लाख रुपये मंजूर झाले आहेत. जुलै २०२४ च्या नियोजित आराखड्यानुसार ही सर्व बांधकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले आहे. अनेक ठिकाणी हक्काची इमारत नसल्यामुळे शासकीय कामकाजात अडचणी येत होत्या. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ही सुसज्ज कार्यालये उभी राहणार असल्याने, ग्रामीण भागातील जनतेला शासकीय सेवा मिळणे अधिक सुलभ होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.