Monsoon Rain Update: रत्नागिरी वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. दापोली, खेड, राजापूरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जगबुडी, अर्जुना व कोदवलीच्या पुराचे पाणी किनाऱ्यावरील भागात शिरले. पूर ओसरला असला तरीही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. .सोमवारी (ता. ६) ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जगबुडीच्या पुरामुळे खेड बाजारपेठ, तीनबत्ती नाका, मच्छीमार्केट परिसरात पुराचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती. खांबतळे झोपडपट्टी भागातील ४५ जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सोमवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे स्थित पूर्ववत आहे. राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट जवाहर चौकात शिरले होते..Rain Update: तीन जिल्ह्यांतील १६७ मंडलांत हलका पाऊस .त्यामुळे एसटी वाहतूक आणि राजापूर-शिळ-गोठणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लांजा वाकेड येथील पेट्रोल पंपावर दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन परप्रांतीय कामगार बालबाल बचावले. सर्वाधिक तडाखा दापोली तालुक्याला बसला असून जालगाव, गिम्हवणे परिसरात पावसाने हाहाकार उडवला. इमारतींच्या तळमजल्यात २ ते ३ फूट पाणी साचले होते. सायंकाळी मिरजोळी परिसरात पुराचे पाणी घुसले..Raigad Safety Alert: रायगडला सतर्कतेचा इशारा.रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड परिसरातील जिंदाल कंपनीजवळ महामार्गावर पुराचे पाणी साचल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ८ तासांपासून ठप्प झाली होती. सोमवारीही वाहतुकीवर परीणाम झाला. .तसेच कशेडीमध्ये महामार्गावर दरड काढण्याचे काम चालू असून एका घराला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या घरातील ३ लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.