Amaravati News : दारिद्र्यरेषेखालील जनतेला स्वस्तःत व मोफत धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागामार्फत धान्य पुरविल्या जाते. अमरावती जिल्ह्यात प्राधान्य व अंत्योदय गटातील पाच लाख आठ हजार ६२७ कार्डधारकांना याचा लाभ मिळतो. यामध्ये आयकर दात्यांचाही समावेश असून जिल्ह्यात असे ३९ हजार ९५६ कार्डधारक आहेत. त्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे. सर्वाधिक संख्या अमरावती शहरातील आहे..नोकरदार व सेवानिवृत्तांचे स्वस्त धान्य दुकानांमधून मिळणारे रेशन बंद केल्यानंतर शासनाने आता आयकर दात्यांकडे मोर्चा वळविला आहे. आयकर दात्यांनी स्वतःहून पुढाकर घेत धान्य उचलणे बंद करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप पुरवठा विभागाने केलेल्या आवाहनास कुणीही प्रतिसाद दिलेला नाही..ration Card e-KYC : लाखभर लाभार्थ्यांचे ई-केवायसी अपूर्ण.दरम्यान, केंद्र सरकारकडून राज्य शासनाला व तेथून जिल्हा पुरवठा विभागास जिल्ह्यातील आयकर दात्यांची यादी आली आहे. तालुकानिहाय ही यादी असून आता त्यांचा शोध घेऊन धान्य बंद करण्याची प्रक्रिया प्रारंभ होणार आहे. या कार्डधारकांना जून ते ऑगस्ट, या तीन महिन्यांचे धान्य मिळाले असून सप्टेंबरपासून देण्यात येणार किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट नाही..प्रत्येक कार्डधारकाचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक असल्याने अशा कार्डधारकांचा शोध लावणे सहज शक्य असल्याने आगामी काळात शोधमोहीम राबवत धान्य बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली..Ration Card KYC : जालन्यात तीन लाख रेशन कार्डधारकांचे ‘केवायसी’ प्रलंबित .पुढील टप्पा जीएसटी व कर्ज घेणाऱ्यांसाठीआयकर दात्यांनंतर बॅंकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेणारे व जीएसटी भरणारे रडारवर आहेत. या दोन्ही प्रकारातील कार्डधारक धान्य उचलतात का, हे तपासून त्यांचेही धान्य बंद करण्याची योजना आहे. त्यासाठी बांधकाम, व्यवसाय व इतर कामांसाठी आयकर मर्यादेच्या वर कर्ज घेणाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. .यासोबतच व्यवसाय करणारे व जीएसटी भरणाऱ्यांचाही शोध घेण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरून त्याची माहिती संकलित करण्यात येत आहे. जीएसटीची मर्यादा किती असेल, हे मात्र स्पष्ट नाही.तालुकानिहाय आयकर दाते (रेशनचे लाभार्थी)अचलपूर ः ३,७९७, अमरावती ः २,५५४, अमरावती शहर ः १२,३०६, अंजनगावसुर्जी ः १,४७५, चांदूरबाजार ः २,८०४, चांदूररेल्वे ः १,४३३, चिखलदरा ः १,६२७, दर्यापूर ः १,५७३, धामणगावरेल्वे ः १,६२८, धारणी ः २,६८७, मोर्शी ः १,४१६, नांदगाव खंडेश्वर ः १,२४७, भातकुली ः १,७२६, तिवसा ः १,३६२, वरुड ः २,३२१..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.