Jalna News: भोकरदन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे सहा महिन्यांपासून अनुदान थकीत आहे. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. .मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.भोकरदन तालुक्यात एकूण २०७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. काही दुकाने सहकारी संस्था आणि महिला बचत गट यांनाही जोडली आहेत..Ration Shop : रेशन दुकानातून मुदतबाह्य रव्याचे वाटप.जे सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून नागरिकांना रास्त दरात धान्य पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. रेशन दुकानदारांना प्रतिकिलो शिधामागे १ रुपये ५० पैसे इतके कमिशन मिळते. .Ration Shop : नव्याने ९० गावांत होणार रास्त भाव धान्य दुकाने.तालुक्यातील २०७ दुकानदारांना जुलैपर्यंतची रक्कम अदा झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यांचे कमिशन न मिळाल्याने या सर्व दुकानदारांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. घरखर्च, दुकानाचे भाडे, वीजबिल आणि इतर दैनंदिन खर्च भागवणे दुकानदारांना कठीण झाले आहे..सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केली असून, त्या प्रक्रियेमध्येही मोठ्या अडचणी येत आहेत. वारंवार बिघाड होत असल्याने ई-पॉस मशीन ठप्प होऊन लाभार्थींना धान्य वाटप करतानाही अडचणी येतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.