Grain ATM for Ration Grain Distribution: रेशनच्या धान्यासाठी दुकानांचे हेलपाटे मारणे आणि तासन्तास रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून लाभार्थींची सुटका करण्यासाठी नाशिकमध्ये धान्य एटीएम सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यासाठी तयारी केली असून, नाशिकरोड येथील जुन्या धान्य गोदामात राज्यातील प्रायोगिक उपक्रमातील पहिले धान्य एटीएम उभारण्याचे काम सुरू आहे. हे यंत्र कार्यान्वित झाल्यानंतर लाभार्थींना निर्धारित कोट्यानुसार धान्य घेणे अधिक सोयीचे होणार आहे..राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना दरमहा गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिले जातात. लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह या धान्यावर अवलंबून आहे. मात्र, ई-पॉस यंत्रातील तांत्रिक अडचणी, सर्व्हरमधील बिघाड आणि काही ठिकाणी रेशन दुकानदारांकडून होणारा विलंब यामुळे लाभार्थींना वेळेत धान्य मिळण्यात अडथळे येतात..Food Grain Production: रब्बीमध्ये १७७७ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट.यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पुरवठा विभागाने धान्य एटीएमचा पर्याय पुढे आणला आहे. नाशिक आणि नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा उभारण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात धान्य वितरण अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे..नाशिकरोडला १०० क्विंटलची क्षमतानाशिकरोड येथील जुन्या धान्य गोदामात उभारण्यात येणाऱ्या धान्य एटीएमची क्षमता १०० क्विंटल असेल. त्यामध्ये प्रत्येकी ५० क्विंटल गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यंत्रातील धान्याचा साठा संपल्यास तो तातडीने भरून देण्याची जबाबदारी संबंधित रेशन दुकानदारावर सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी दिली..European Grain Production: युरोपातील धान्य उत्पादनात मोठी घट.अंगठ्याच्या ठशानंतर मिळणार धान्यधान्य एटीएमवर रेशन दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ई-पॉस यंत्रणेद्वारे लाभार्थींची पडताळणी केली जाईल. लाभार्थ्याला आधार किंवा शिधापत्रिकेच्या क्रमांकाच्या आधारे ओळख नोंदवून अंगठ्याचा ठसा द्यावा लागेल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार धान्य वितरित केले जाईल. त्यामुळे धान्याच्या वजनातील तफावत कमी होऊन वितरणात पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे..धान्य एटीएमची वैशिष्ट्येपाच मिनिटांत ५० किलोपर्यंत धान्य वितरणाची सुविधा.बँकेच्या एटीएमप्रमाणे चोवीस तास सेवा देण्याचे नियोजन.गहू आणि तांदळाचे वजन करून वितरण.आधार किंवा शिधापत्रिका क्रमांकाद्वारे लाभार्थ्याची ओळख.अंगठ्याच्या ठशाद्वारे पडताळणी.‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजनेअंतर्गत लाभ घेण्याची सुविधा.सौर ऊर्जेवरही यंत्र चालविण्याची व्यवस्था..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.