Maharashtra News : कर्जत राज्य सरकारच्या ‘मिशन सुधार अभियान’अंतर्गत रायगड जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ५६५ लाभार्थी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित राहणार आहेत. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात १९ हजार ८११ जणांचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे, तर ३० हजार ८४ जणांनी मागील अनेक महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्य घेतलेले नाही. या सर्वांची नावे सवलतीच्या दरात धान्य मिळणाऱ्या प्राधान्य गटातून वगळण्यात येणार आहेत..पुरवठा विभागाने सध्या ‘मिशन सुधार’ मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. वरिष्ठ पातळीवरून दर आठवड्याला या मोहिमेचा आढावा घेतला जात आहे, मात्र ऐन दुष्काळी परिस्थितीत ही मोहीम तीव्र करण्यात आल्याने त्याबद्दल आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत..Banana Farming: ‘बीटेक’ पदवीप्राप्त तरुणाचा निर्यातक्षम केळी उत्पादनाचा ध्यास.दुष्काळी परिस्थितीत या मोहिमेमुळे लाभार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी लक्षात घेऊन मोहीम तात्पुरत्या स्वरूपात थांबवावी, अशी मागणीही होत आहे. ‘मिशन सुधार’ मोहिमेमुळे सवलतीच्या प्राधान्य गटातून शिधापत्रिकाधारकांची नावे वगळण्यात आली असली, तरी त्यांच्या शिधापत्रिका कार्यरत राहणार आहेत, मात्र त्यांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार नाही. कर्जत तालुक्यातील १५४ रास्त भाव धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित केले जाते. तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेचे १० हजार ३९५ लाभार्थी, केशरी शिधापत्रिकाधारक ३१ हजार ५१४, तर पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांची संख्या एक हजार १०० आहे. यापैकी आतापर्यंत सात हजार १४० जणांची नावे कमी करण्यात आली आहेत..Fodder Crop Cultivation: रब्बीत चाऱ्याची लागवड करा, सरकार हमीभावाने विकत घेणार- मुख्यमंत्री फडणवीस.दुष्काळात फटकाराज्य सरकारने गरजू आणि पात्र शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, तसेच अन्नसुरक्षा योजनेतील गैरव्यवहार रोखून बनावट शिधापत्रिका रद्द करण्यासाठी ‘मिशन सुधार’ मोहीम सुरू केली आहे, मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत या मोहिमेचा फटका नागरिकांना बसत आहे..शासनाकडून आयकर विभागासह इतर विभागांचा अधिकृत डेटा मिळवून या कार्डधारकांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अन्नसुरक्षा योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र कार्डधारकांनी संपर्क साधल्यानंतर त्यांची पुन्हा शहानिशा करण्यात येईल.- रवींद्र दळवी, महसूल पुरवठा शाखा अधिकारी, कर्जत.कमी करण्यात आलेली नावेअलिबाग : ८,५७५कर्जत : ७,८८३खालापूर : ६,२९६महाड : ४,११६माणगाव : ५,८४६म्हसळा : १,९३३मुरूड : ३,८३८पनवेल : ४०,१९४पेण : ११,५६४पोलादपूर : १,२१३रोहा : ७,६२५श्रीवर्धन : १,६२७सुधागड : २,६१०तळा : २,०७९उरण : ९,१६६एकूण : १ लाख १४ हजार ५६५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.