Solapur News: सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी निवडीतही आपले ‘धक्कातंत्र’ कायम ठेवले आहे. पक्षाच्या गटनेतेपदी करमाळ्यातील पांडे गटातून विजयी झालेल्या रश्मी बागल यांची अनपेक्षित नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘उपनेते’ पदाची निर्मिती करून मंगळवेढ्याचे प्रदीप खांडेकर यांना संधी देण्यात आली आहे..भाजपने ६८ पैकी ३८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. प्रशासकीय कामात शिस्त लावण्यासाठी आणि सदस्यांकडून प्रभावी काम करून घेण्यासाठी पक्षाने अनुभवी चेहऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. .Gau Rashak In Maharashtra : कसगीची ६० वर्षाची यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्येही प्रसिद्ध का आहे?.राष्ट्रवादी आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बागल यांच्याकडे आता सभागृहाचे नेतृत्व असेल. मंगळवेढा तालुक्यातील भोसे गटातून निवडून आलेले प्रदीप खांडेकर हे आता उपनेते असतील. त्याशिवाय चेतनसिंह केदार-सावंत यांच्याकडे प्रतोद म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे..Zilla Parishad President: धाराशिव ‘झेडपी’ अध्यक्ष, सभापती निवडीचा मार्ग मोकळा.पश्चिम सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि सांगोल्याच्या चोपडी गटातील विजयी उमेदवार केदार-सावंत यांच्याकडे पक्षाचा ‘व्हीप’ (आदेश) काढण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे विश्वासू सहकारी आणि बोरामणी गटातून विजयी झालेले नेताजी खंडागळे यांना प्रवक्ते करण्यात आले आहे, ते आता जिल्हा परिषदेत भाजपची अधिकृत बाजू मांडतील..भाजपचा पहिला अध्यक्ष कोण?जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले आहे, त्यामुळे अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. येत्या २० मार्चला निवडीची ही प्रक्रिया पार पडणार आहे. आता या ऐतिहासिक पदावर पक्ष कोणाची वर्णी लावणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.