Raigad News: ऐतिहासिक घोसाळेगड परिसरात निसर्गाचा अनोखा अविष्कार पाहायला मिळत आहे. सामान्यतः लाल रंगाच्या फुलांनी बहरणारी देवसावर येथे चक्क पिवळ्या रंगात पाहायला मिळत आहे. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ मानला जात असून, या पिवळ्या फुलांच्या झाडामुळे पर्यावरण अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे..निसर्गतः देवसावर किंवा सावरीची फुले ही लाल रंगाचीच असतात. परंतु, क्वचित प्रसंगी पिवळी देवसावर बहरते. झाडातील अँथोसायनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे किंवा जनुकीय रचनेत बदल झाल्यामुळे या फुलांना पिवळा रंग प्राप्त होतो..Yellow Pea Import: पिवळ्या वाटाण्यावर ३० टक्के आयात शुल्क.रायगड जिल्ह्यात फणसाड अभयारण्य आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची झाडे मोजक्याच ठिकाणी नोंदवली गेली आहेत. जानेवारी ते मार्च हा या झाडाचा बहराचा काळ असतो. पानगळ झालेली असताना फांद्यांवर ही पिवळी फुले येतात..Yellow Mosaic: सोयाबीनवरील पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव कसा रोखावा? .एक बहुगुणी वृक्षयाचे लाकूड हलके असल्याने आगपेट्या आणि खेळणी बनवण्यासाठी वापरले जाते. शेंगांमधील रेशमी कापूस (सिल्क कॉटन) उशा आणि गाद्यांसाठी उत्तम असतो. साल आणि डिंकाचा वापर पारंपरिक औषधांमध्ये अतिसार आणि रक्तदोष दूर करण्यासाठी होतो. मंदिर परिसरात पवित्र वृक्ष म्हणून लागवड आणि पूजन करण्याची प्रथा आहे..पिवळी देवसावर निसर्गाच्या वैविध्याचा एक उत्तम नमुना आहे. जनुकीय बदलामुळे होणारा हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. सध्या वाढते वणवे आणि अवैध वृक्षतोडीमुळे अशा दुर्मिळ प्रजाती धोक्यात येत आहेत. या विशिष्ट झाडाच्या बियांचे संकलन करून त्याचे संवर्धन करणे आणि अशा म्युटेशनचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने आणि वनविभागाने या झाडाला विशेष संरक्षण द्यावे, जेणेकरून भविष्यातील पिढीला हा निसर्ग ठेवा पाहता येईल.- रोशन म्हात्रे, पर्यावरण अभ्यासक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.