Solapur News: चिंचोली (ता. बार्शी) गावालगत वाहणाऱ्या नीलकंठा नदीवर पाणपक्ष्यांचे दुर्मीळ दर्शन झाल्याने परिसरातील पक्षी मित्रांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणपणे हिमालयाच्या बाजूच्या प्रदेशात आणि दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय आशियातील पाणथळ भागात आढळणारा हा पाणपक्षी प्रथमच या भागात दिसून आल्याने ही घटना विशेष मानली जात आहे..नीलकंठा नदीतील पाण्यात हा पक्षी शांतपणे वावरताना स्थानिक नागरिकांच्या आणि पक्षी निरीक्षकांच्या नजरेस पडला. माहिती मिळताच परिसरातील अनेक पक्षीमित्रांनी नदीकाठावर गर्दी करून या पक्ष्यांचे निरीक्षण केले व छायाचित्रे घेतली. हवामानातील बदल, स्थलांतराच्या मार्गातील बदल किंवा नदी परिसरातील वाढलेली जैवविविधता यामुळे अशा दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन होण्याची शक्यता वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला..Rare Plant : तिलारीच्या जंगलात आढळली कचूर वनस्पती.हा पाणपक्षी आकाराने मोठा असून, त्याची ओळख सहज पटते. प्रौढ पक्ष्याची लांब, जाड आणि चमकदार पिवळी चोच हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य असून, चोचीचे टोक किंचित आतल्या बाजूला वळलेले असते. त्याचे पंख प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचे असून, त्यावर काळ्या पट्टेदार खुणा स्पष्ट दिसतात. छातीवर ठिपकेदार पट्टा आढळतो..Rare Trees Species : दुर्मीळ वृक्ष रोपनिर्मितीचा घेतलाय वसा.विशेष म्हणजे, प्रौढ पक्ष्याच्या मागील बाजूस असलेली गुलाबी रंगाची पिसे त्याला वेगळे व आकर्षक रूप देतात. सामान्यतः हे पक्षी पाणथळ जागा, नद्या, सरोवरे, दलदलीच्या परिसरात आढळतात. मासे, लहान जलचर व इतर पाण्यातील जीव हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. नीलकंठा नदीत मुबलक पाणी व जैवसंपदा उपलब्ध असल्याने हा पक्षी काही काळ येथे वास्तव्यास थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..नीलकंठा नदी परिसराचे संवर्धन-संरक्षण गरजेचेस्थानिक पक्षिमित्रांनी आणि निसर्गप्रेमींनी या घटनेचे स्वागत केले असून, नीलकंठा नदी परिसराचे संवर्धन व संरक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. अशा दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन हे परिसरातील पर्यावरणीय संतुलनाचे सकारात्मक द्योतक आहे. प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी मिळून नदी व आसपासच्या पाणथळ क्षेत्राचे संरक्षण केल्यास भविष्यात आणखी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.