Satara News: वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात दुर्मिळ वन्यप्राणी शेकरू याचे दर्शन झाल्याने परिसरात उत्सुकता व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..महाविद्यालयाच्या हिरवळीने नटलेल्या परिसरात हा दुर्मिळ प्राणी आढळून आल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. .Beed Farmers: बीडमध्ये ५३ शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर ‘समूहप्रथम दर्शनी’मधून प्रात्यक्षिके.शिक्षक शशांक निकुंभ यांनी सकाळच्या सुमारास झाडांवर उड्या मारत फिरणारा शेकरू पाहिला. काही विद्यार्थ्यांनी त्याचे छायाचित्रणही केले.प्राणी नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरताना दिसून आला..Leopard Sighting: कर्जतमधील वरेडी हद्दीत बिबट्याचा वावर वाढला.याबाबत प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक राहुल तायडे यांनी सांगितले, “शेकरू हा राज्यप्राणी असून, तो सहसा घनदाट जंगलात आढळतो. महाविद्यालय परिसरात त्याचे दर्शन होणे ही पर्यावरणीय समृद्धीची बाब आहे.’’.प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी या वन्यप्राण्यांचे संवर्धन व संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता निसर्गसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरातील वृक्षसंपदा व पर्यावरणीय संतुलनाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, निसर्गप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.